03 March 2021

News Flash

हेचि दान देगा द्यावा तुझा विसर न व्हावा! राज्यभरात बाप्पाला निरोप

जड अंत:करणाने लाडक्या बाप्पाला निरोप

मोठ्या उत्साहात आणि जड अंत:करणाने दहा दिवसांच्या सार्वजनिक आणि घरगुती बाप्पांना गुरूवारी निरोप देण्यात आला. गेले 10 दिवस आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर गुरूवारी ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषणात बाप्पाला निरोप देण्यात आला. बाप्पाच्या मिरवणुकीत कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज होती.

गणपती विसर्जन सुरळीत व्हावं यासाठी मुंबईत 50 हजार पोलीस तैनात करण्यात आले होते. तसंच पोलीसांसह एसआरपीएफ, फोर्स वन, क्यूआरटी, फोर्स वन, रॅपिड अॅक्शन फोर्स यांची अतिरिक्त कुमक सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली होती.तर संपूर्ण राज्यभरात 2 लाखांच्यावर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तर सर्वत्र सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही नजर ठेवण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पोलिसांकडून काळजी घेण्यात आली होती. तसंच विसर्जनादरम्यान वाहतुककोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनीही काळजी खबरदारी घेतली होती.

पुढील वर्षी बाप्पा लवकर येणार
आनंदाची बाब म्हणजे लाडका बाप्पा पुढील वर्षी 11 दिवस लवकर येणार आहे. पुढील वर्षी शनिवार 22 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी येणार आहे.

Live Blog

08:26 (IST)13 Sep 2019
लालबागच्या राजाचं विसर्जन

22 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला. गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं. विसर्जनादरम्यान मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती. तसंच मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी हेदेखील विसर्जनादरम्यान उपस्थित होते. 

08:01 (IST)13 Sep 2019
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन करण्यात आलं.

07:42 (IST)13 Sep 2019
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानीही उपस्थित

लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे. विसर्जनासाठी शेकडो भक्तांनी चौपाटीवर गर्दी केली आहे. रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी हेदेखील लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल झाले आहेत.

07:30 (IST)13 Sep 2019
भोपाळमध्ये विर्जनादरम्यान मोठी दुर्घटना

भोपाळमध्ये गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. विसर्जनासाठी गेलेली बोट उलटून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 

06:11 (IST)13 Sep 2019
लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; थोड्याच वेळात होणार विसर्जन

20 तासांच्या प्रवासानंतर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे आरती नंतर थोड्याच वेळात विसर्जन होणार आहे.

05:47 (IST)13 Sep 2019
पुणे - खडकवासला धरणातून नदी पात्रामध्ये मध्यरात्री पाणी सोडण्यात आल्यामुळे नागरिकांची वाहने वाहून गेली

खडकवासला धरणातून नदी पात्रामध्ये मध्यरात्री 2 वाजता 13 हजार 981 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. प्रशासनाने मिरवणुकी दरम्यान माईकवर आवाहन करायला हवे होते. असे केले असते तर आम्ही आमच्या गाड्या सुरक्षित ठिकाणी हलविल्या असत्या. ते देखील प्रशासनाकडून करण्यात आले नाही. अशा शब्दात अनेक नागरिकांनी रोष व्यक्त केला.

00:40 (IST)13 Sep 2019
पुणे - मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

कुमठेकर रोडवर एका मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

22:59 (IST)12 Sep 2019
मुंबईमध्ये रात्री ९ पर्यंत विविध ठिकाणी २२१६८ गणेश मूर्तींचे विसर्जन

मुंबईच्या विविध कृत्रिम तलावांमध्ये २९०१  गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले

22:36 (IST)12 Sep 2019
अहमदनगर - गणेश विसर्जना दरम्यान दोन तरुणांचा नदीत बुडून मुत्यू

राज्यभरात  गणेश विसर्जनावेळी  विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये ९ जण बुडाले आहेत

22:10 (IST)12 Sep 2019
गिरगाव चौपाटीवर विसर्जनावेळी ४१ जण किरकोळ जखमी

गिरगावचौपाटीवर विसर्जनादरम्यान वेगवेगळ्या घटनांमध्ये ४१ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

21:11 (IST)12 Sep 2019
नाशकात मेहेर सिग्नलवरच्या हायमास्टमध्ये करंट

नाशकात मेहेर सिग्नलवरच्या हायमास्टमध्ये करंट उतरला आहे. गणेशभक्तांना खांबाला हात न लावण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

20:50 (IST)12 Sep 2019
मुंबईमध्ये आतापर्यंत नऊ हजार बाप्पांना निरोप

सकाळपासून आतापर्यंत नऊ हजार बाप्पांना मुंबईकरांनी निरोप दिला आहे. यावेळी पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता 

19:56 (IST)12 Sep 2019
पुणे - अमृतेश्वर विसर्जन घाटावर बोट पलटली, बोटीतील सर्वजण सुखरुप

अमृतेश्वर विसर्जन घाटावर गणपती विसर्जनासाठी निघालेली बोट संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पलटी झाल्याचे वृत्त आहे. अग्निशमन दलाचे जवान विनोद सरोदे आणि जीवरक्षकांनी या बोटीतील ३ पुरुषांचे जीव वाचविले असून गेल्या तीन दिवसांत अग्निशमन दलाकडून ६ जणांना वाचविण्यात यश आले आहे. त्याचबरोबर औंध येथील विसर्जन घाटावर विसर्जनादरम्यान पाय घसरल्याने १४ वर्षीय मुलगी पाण्यात बुडाली असताना प्रभारी अग्निशमन अधिकारी कमलेश सनगाळे तर तिथेच एका ५४ वर्षीय व्यक्तीला बुडताना चंद्रकांत बुरुड यांनी वाचवले. सलग घडणाऱ्या या घटनांमधे अग्निशमन दलाने ८ जणांना जीवदानच दिले.

18:36 (IST)12 Sep 2019
पुणे - मानाचा पाचवा केसरी वाडा गणपतीचे विसर्जन

पुण्यातल्या सार्वजनिक गणोशोत्सवात मानाचा पाचवा गणपती म्हणून ओळख असलेला केसरी वाडा गणपतीचे विसर्जन झाले आहे. या गणपतीच्या विसर्जनानंतर पुण्यातील सर्व पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन पार पडले असून यानंतर इतर मंडळांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे.

18:21 (IST)12 Sep 2019
पुणे - मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचे विसर्जन

पुण्यातील मानाचा चौथा गणपती म्हणून ओळख असलेल्या तुळशीबाग गणपतीचे विसर्जन झाले.

18:01 (IST)12 Sep 2019
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीतील मनमोहक दृश्य

लालबागचा राजा श्रॉफ इमारतीजवळ पोहोचला असता पुष्पवृष्टी करण्यात आल्याची मनमोहक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत

17:56 (IST)12 Sep 2019
पुणे - मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचे विसर्जन

पुणे - मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचे विसर्जनही उत्साहात पार पडलं. 

17:40 (IST)12 Sep 2019
पुणे- मानाची दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन

17:37 (IST)12 Sep 2019
पिंपरी-चिंचवड शहरात २८ हजार मुर्तींचं दान

गेल्या २४ वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये संस्कार प्रतिष्ठान हे मूर्तीदान आणि निर्माल्य जमा करण्याचे काम करत आहे. या वर्षी देखील त्यांनी हा उपक्रम राबवला असून दुपारपर्यंत तब्बल २८ हजार मूर्ती दान झाल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत ५० हजार मूर्तीदान होईल असे संस्कार प्रतिष्ठानचे मोहन गायकवाड यांनी सांगितले आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे असे ते म्हणाले. 

17:24 (IST)12 Sep 2019
पुण्यातील मानाचा पहिला कसबा गपपतीचं विसर्जन

16:57 (IST)12 Sep 2019
पुणे - मानाच्या गणपतींचं विसर्जन

पुण्यातील मानाचा पहिला कसबा गपपतीचे दुपारी ४.३२ मिनिटांनी तर दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन ४.४९ वाजता पार पडलं.

16:05 (IST)12 Sep 2019
पुणे - गणपती विसर्जन करताना एक तरुण बुडाला

वृदेश्वर घाटाजवळ गणपती विसर्जन करताना एक तरुण बुडाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तरुणाला वाचवले.

15:56 (IST)12 Sep 2019
मुंबईत गणपती विसर्जनाचा उत्साह

(फोटो - अमित चक्रवर्ती)

15:55 (IST)12 Sep 2019
पुणे - थेरगावमध्ये गणपती मुर्तीचं कृत्रिम हौदात विसर्जन

पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव येथील घाटावर घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात येत आहे

15:15 (IST)12 Sep 2019
पुण्यात विसर्जन मिरवणुकीत समाज प्रबोधन

पुण्यातील महात्मा फुले मंडई येथून मानाच्या पाच गणपतीची विसर्जन मिरवणुकीला सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भाविक रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठया संख्येने जमले आहे. तर याच विसर्जन मिरवणुकीत मानाच्या चौथा तुळशीबाग गणपतीमध्ये ॐ नमो परिवाराचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. या सर्वाकडून प्रत्येक व्यक्तीनं अवयवदान करावं, असं सांगत पत्रकं हाती घेऊन प्रबोधन केलं जात आहे.

14:56 (IST)12 Sep 2019
मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जन मिरवणुकी मध्ये कलावंताचे पथक सहभागी

मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जन मिरवणुकी मध्ये कलावंताचे पथक सहभागी झालं आहे. यामध्ये श्रृती मराठे, सौरभ गोखले, अभिज्ञा भावे, स्नेहलता वसईकर यांनी ढोल ताशे वाजवत  बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यात सहभागी झाले आहेत.

  

14:07 (IST)12 Sep 2019
पुणे : मानाचा पाचवा केसरी गणपती मार्गस्थ

पुण्यातील मानाचा पाचवा केसरी गणपती मार्गस्थ झाला आहे. 

13:36 (IST)12 Sep 2019
पुण्यातील मानाचे पाच गणपती

पुण्यातील मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींची झलक

13:04 (IST)12 Sep 2019
हैदराबादमधील सर्वात उंच बाप्पाच्या विसर्सन मिरवणूक सुरू

हैदराबादमधील खैराताबाद येथील 61 फुट उंचीच्या गणपतीच्या विसर्जनाला सुरूवात झाली आहे. मुंबईतील लालबागच्या राजाप्रमाणेच हैदराबादमध्ये या गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. गणपतीच्या या मूर्तीचे वजन तब्बल 50 टन असून ही मूर्ती तयार करण्यासाठी एक कोटी रूपयांचा खर्च आला आहे. हुसेन सागर तलावात या मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.

12:50 (IST)12 Sep 2019
गुलालाची उधळण करत चंदनवाडीच्या बाप्पाला निरोप

ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत मुंबईतील चंदनवाडी गणपतीच्या बाप्पाच्या मिरवणुकीला सुरूवात झाली. अनंत चतुर्दशीला जेव्हा गणपतीची विसर्जन मिरवणुक निघते तेव्हा अनेक भाविकांकडून गणपतीवर साखर उधळली जाते. 

12:37 (IST)12 Sep 2019
चंदनवाडी गणपतीच्या विसर्जनात ढोल ताशांचा गजर

ढोल ताशांच्या गजरात मुंबईतील चंदनवाडी गणपतीच्या विसर्जनाला सुरूवात करण्यात आली. अनंत चतुर्दशीला जेव्हा गणपतीची विसर्जन मिरवणुक निघते तेव्हा अनेक भाविकांकडून गणपतीवर साखर उधळली जाते. गेल्या १२ वर्षांपासून ही परंपरा मंडळाने ही परंपरा कायम ठेवली आहे. 

12:31 (IST)12 Sep 2019
विसर्जनासाठी गेलेला तरूण कोयना नदीत वाहून गेला

घरातील गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेलल्या युवकाचा कोयना नदीपात्रात वाहून गेला. सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कोयना नदीच्या पाण्याला प्रवाह असल्यामुळे त्याचा मृतदेह शोधण्यात अडथळे येत आहेत. त्याचा मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

12:00 (IST)12 Sep 2019
पुणे: मानाचा चौथा तुळशी बाग गणपतीच्या विसर्जनाला सुरूवात

मानाचा चौथा तुळशी बाग गणपतीच्या विसर्जनाला सुरूवात झाली आहे. यावेळी बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांसोबतच पावसानेही हजेरी लावली आहे.

11:54 (IST)12 Sep 2019
परळच्या राजाच्या मिरवणुकीला सुरूवात

परळचा राजा (नरेपार्क) आणि प्रगती सेवा मंडळ (मांटुंगा) गणपती विसर्जना सुरूवात. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.

11:41 (IST)12 Sep 2019
पुणे : मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीला सुरूवात

मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाची नादब्रह्म ढोल ताशा पथकाच्या गजरात मिरवणुकीला सुरवात. सालाबादाप्रमाणे यंदा देखील मिरवणुकीत गुलालाची उधळण करण्यात आली.

11:40 (IST)12 Sep 2019
पुणे: मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात

मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात. या मिरवणुकीचे शंखनाद हे वैशिष्ट्य असून यंदा देखील अगदी सुरेल पद्धतीने सादर करण्यात आले. हे पाहण्यासाठी पुणेकर नागरिकांनी एकच गर्दी केली.

11:37 (IST)12 Sep 2019
लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला सुरूवात

मुंबईतील लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. तसंच मुंबीतील तेजुकाया मंडळाच्या बाप्पाच्या विसर्जनालाही सुरूवात झाली आहे.

11:28 (IST)12 Sep 2019
पुढची पाच वर्ष काम करण्याची संधी मिळावी ही बाप्पा चरणी प्रार्थना : निलम गोऱ्हे

संपूर्ण देशात आणि राज्यात विकासाची संधी आम्हाला मिळावी. तसंच पुढील पाच वर्ष आम्हाला राज्यात विकासाची संधी मिळावी. राज्यात नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या बांधवांना धीर मिळावा हीच बाप्पा चरणी प्रार्थना असल्याचे विधानसभेच्या उप सभापती निलम गोऱ्हे म्हणाल्या.

11:20 (IST)12 Sep 2019
बाप्पाची मिरवणूक वेळेत पार पाडावी : मुक्ता टिळक

गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. ही मिरवणूक जोशात, जल्लोषात परंतु वेळेत पार पाडावी असं आवाहन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केलं आहे. तसंच यावेळी त्यांनी पुणे शहरात सुख समृद्धी नांदू दे अशी प्रार्थना गणपतीच्या चरणी केली.

11:01 (IST)12 Sep 2019
मुंबईतील वाहतूक मार्गांमध्ये बदल

मुंबईतील 53 रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. तसंच वाहतुककोडी होऊ नये, विसर्जन मिरवणूक आणि वाहनचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबईतील मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त 99 ठिकाणी पार्किंगही बंद करण्यात आली आहे.

10:54 (IST)12 Sep 2019
पुण्यातील मिरवणूक मार्गावर सामाजिक संदेश देणारी रांगोळी

पुण्यातील मिरवणूक मार्गावर राष्ट्रीय कला अकादमीने यंदाही सामाजिक संदेश देणारी रांगोळी साकारली आहे. पर्यावरण ऱ्हासाकडे रांगोळीतून लक्ष वेधण्यात आले आहे.

10:45 (IST)12 Sep 2019
पुण्यात मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात

पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणुकीला मंडई चौकामधून सुरुवात झाली आहे. मिरवणुकीत शिवसेनेच्या नेत्या आणि विधानसभेच्या उपसभापती निलम गोऱ्हे आणि पुणे महानगरपालिकेच्या महापौर मुक्ता टिळक यादेखील सहभागी झाल्या आहेत. यावेळी त्यांनी बाप्पाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

10:40 (IST)12 Sep 2019
मुंबईच्या राजाच्या मिरवणुकीला सुरूवात

गणेशगल्लीतील प्रसिद्ध मुंबईच्या राजाच्या मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. मुंबईच्या राजावर लालबागमध्ये पुष्पवृष्टी करण्यात आली. दहा दिवसांच्या सेवेनंतर बाप्पाला आज जड अंत:करणाने निरोप देण्यात येत आहे. 

Next Stories
1 गणेश नाईक, हर्षवर्धन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
2  ‘सरकार ‘त्या’ निर्वासितांबाबत उदार असू शकते, आम्ही नाही’
3 गुणवत्तापूर्ण शिक्षण ही राज्याची ओळख असली पाहिजे
Just Now!
X