02 December 2020

News Flash

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

वाढदिवसाच्या पार्टीनिमित्त एका मैत्रिणीसोबत गेलेल्या १३ वर्षांच्या मुलीवर चार तरुणांनी बलात्कार केल्याची घटना वाकोला येथे शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी तिच्या मैत्रिणीसह चार तरुणांना पोलिसांनी

| April 27, 2013 05:29 am

वाढदिवसाच्या पार्टीनिमित्त एका मैत्रिणीसोबत गेलेल्या १३ वर्षांच्या मुलीवर चार तरुणांनी बलात्कार केल्याची घटना वाकोला येथे शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी तिच्या मैत्रिणीसह चार तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. हे चारही तरुण तसेच पीडित मुलगी आणि तिची मैत्रीण मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित मुलीला फसवून शीतपेयातून मद्य देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा अंदाज आहे.
सांताक्रूझ पूर्व येथील वाकोला परिसरातील जागृती मित्र मंडळ परिसरातील एका बैठय़ा चाळीत राहणाऱ्या मेल्विन डिसुझा (२०) याचा शुक्रवारी वाढदिवस होता. त्या पार्टीसाठी त्याने आपल्या काही मित्रांसह त्याची प्रेयसी असलेल्या अल्पवयीन तरुणीला बोलावले होते. या तरुणीने आपल्या शेजारी राहणाऱ्या १३ वर्षे वयाच्या मैत्रिणीलाही सोबत नेले. पार्टी सुरू असतानाच तेथे असलेल्या तरुणांनी या अल्पवयीन मुलीला शीतपेयातून मद्य पाजून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर तिची मैत्रीण व हे चारही तरुण फरार झाले. पीडित मुलीने घरी जाऊन आपल्या आईवडिलांना हा प्रकार सांगितला. त्यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर मुलीला उपचारासाठी व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. फरार झालेल्या मेल्विन डिसुझासह त्याचे मित्र सचिन यादव, वेंकट नायडू आणि बिपिन सिंग यांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एक जण कांदिवली येथील महाविद्यालयात अभियांत्रिकेचे शिक्षण घेत असल्याचे कळते. पीडित मुलीच्या अल्पवयीन मैत्रिणीलाही अटक करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 5:29 am

Web Title: gang rape on minor girl
Next Stories
1 उजनीच्या पाण्यासाठी राष्ट्रवादीची खंडणीखोरी
2 सरकारी रुग्णालयांमध्ये सीसीटीव्हीची नजर
3 सेवा कराविरोधात देशभरातील हॉटेल सोमवारी बंद
Just Now!
X