गुजरात, राजस्थान राज्यांत जाण्यासाठी परप्रांतीय श्रमिकांना बनावट चाचणी अहवाल उपलब्ध करून देणाऱ्या टोळीस घाटकोपर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही टोळी ट्रॅव्हल कंपनीशी संबंधित आहे.

लालबहादूर शास्त्री मार्गावरील गोपाळ भवन बस थांब्याजवळ ही टोळी कार्यरत होती. दोनशे ते तीनशे रुपये स्वीकारून आरोपी गुजरात, राजस्थान राज्यांत जाणाऱ्यांना ‘करोना बाधा नाही’ असे सांगणारा बनावट अहवाल तयार करून देत होते. त्यानंतर या श्रमिकांना स्वत:च्याच वाहनातून या राज्यांत नेत होते. ही बाब महापालिके च्या एन पूर्व विभाग कार्यालयाच्या आरोग्य अधिकाऱ्यांना समजली. त्यांच्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी सापळा रचून टोळीतील सहा आरोपींना अटक केली.