तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर तमाशा जीवनगौरव पुरस्कार गंगाराम कवठेकर यांना प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी केली. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत प्रतिवर्षी तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलावंतास तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मरणार्थ तमाशा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप रुपये पाच लाख, मानचिन्ह, मानपत्र असे आहे.
गेल्या वर्षीच्या पुरस्कारप्राप्त भिमाभाऊ सांगवीकर यांच्या हस्ते २० फेब्रुवारीला वाशी येथे आयोजित तमाशा महोत्सवात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.