29 January 2020

News Flash

कुर्ल्यात सलग दोन दिवस महिलेवर सामूहिक बलात्कार

पोलिसांनी दोघांना अटक केली असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे

कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ३५ वर्षीय महिला कानपूर येथून आली होती. तिघांनी मिळून महिलेवर सामूहिक बलात्कार केला. सलग दोन दिवस आपल्यावर अत्याचार करण्यात आल्याची माहिती पीडित महिलेने पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे. तिसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

गुरुवारी सकाळी पीडित महिला उड्डाणपुलाखाली जखमी अवस्थेत पडलेली असताना, काही स्थानिकांनी फोन करून पोलिसांना महिलेबाबात माहिती दिली. त्यानुसार टिळकनगर पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली आणि महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं. यानंतर पोलिसांनी महिलेचा जवाब नोंदवून बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात तिघांनी मिळून एका ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे. आपल्यावर मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस बलात्कार करण्यात आल्याची माहिती पीडित महिलेने तक्रारीत दिलं असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. पीडित महिलेला सध्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

First Published on November 22, 2019 5:09 pm

Web Title: gangrape on 35 year old woman in lokmanya tilak terminus kurla sgy 87
Next Stories
1 राज्यातील सहा महापालिका भाजपाकडे; लातूर-परभणीत काँग्रेसनं मारली बाजी
2 नर्स ते मुंबईच्या महापौर, किशोरी पेडणेकर यांचा थक्क करणारा जीवनप्रवास
3 संजय राऊतांच्या ‘नीती’चं नवाब मलिकांनी केलं शायरीतून कौतुक
Just Now!
X