15 October 2019

News Flash

कुख्यात गँगस्टर गुरु साटम दक्षिण आफ्रिकेमध्ये ?

मागच्या ३० वर्षांपासून फरार असलेला कुख्यात गँगस्टर गुरु साटम दक्षिण आफ्रिकेमध्ये लपला असण्याची दाट शक्यता आहे. उन्नी पैसे गोळा करुन हवालामार्गे दक्षिण आफ्रिकेत पाठवत होता.

कृष्ण कुमार बाळकृष्ण नायर

मागच्या ३० वर्षांपासून फरार असलेला कुख्यात गँगस्टर गुरु साटम दक्षिण आफ्रिकेमध्ये लपला असण्याची दाट शक्यता आहे. अलीकडेच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केरळमधून खंडणीच्या एका प्रकरणात कृष्ण कुमार बाळकृष्ण नायर उर्फ उन्नीला अटक केली. उन्नी गुरु साटमचा जवळचा साथीदार आहे. उन्नी पैसे गोळा करुन हवालामार्गे दक्षिण आफ्रिकेत पाठवत होता.

त्यामुळे गुरु साटम दक्षिण आफ्रिकेमध्ये लपला असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गुन्हे शाखेने मागच्यावर्षी जुलै महिन्यात साटम टोळीच्या अमोल विचारे, भारत सोलंकी, राजेश आंब्रे, बिपीन धोत्रे आणि दीपक लोधिया यांना बिल्डरकडून खंडणी उकळण्याच्या आरोपाखाली अटक केली होती. या बिल्डरचा परेलमध्ये प्रकल्प सुरु होता.

गुरु साटम परळ येथे रहायचा. त्याच्या गुन्हेगारी कारवायांची सुरुवात याच भागातून झाली. बिपीन धोत्रेच्या चौकशीतून त्याने नायरकरवी गुरु साटमला ६० लाख रुपये पाठवल्याची समोर आले. लोधिया बिल्डरसंबंधीची माहिती गुरु साटमपर्यंत पोहोचवायचा. कृष्ण कुमार बाळकृष्ण नायर मूळचा केरळचा निवासी असून तो हाँगकाँगचे नागरिकत्व मिळवण्याच्या प्रयत्नात होता. बुधवारी तो केरळमध्ये आला होता. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली. हवाला ऑपरेटर असलेला नायर हाँगकाँगहून ते पैसे दक्षिण आफ्रिकेला पाठवायचा. गुन्हे शाखेला १६ जानेवारीपर्यंत त्याची कोठडी मिळाली आहे. साटम अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसाठी काम करायचा. पण आता तो स्वतंत्ररित्या टोळी चालवतो. मुंबईतील अनेक मोठया गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे.

First Published on January 11, 2019 1:02 pm

Web Title: gangster guru satam possibly hinding in south africa