News Flash

‘सेलिब्रिटींचा बाप्पा’मधून तारांकितांचे गणपती दर्शन

‘सेलिब्रिटींचा बाप्पा’ या सदरातून विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी आणि त्यांच्या बाप्पाची भेट घडणार आहे.

संग्रहित छायाचित्र

गणरायाच्या आगमनाची उत्सुकता सगळ्यांनाच असते. त्याच्यासाठी काय करू आणि काय नको, अशी अवस्था घराघरांत होते. सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. नेहमीच्या कामाच्या व्यापातून वेळ काढून गणेशमूर्ती घडवण्यापासून, त्याची आरास, त्याच्यासाठी नैवेद्य, त्यानिमित्ताने एकत्र असलेल्या कुटुंबीयांबरोबरच्या गप्पा हा सगळाच माहौल अनुभवण्यासाठी सेलिब्रिटीही तितकेच उत्सुक असतात. यंदा करोनाचे सावट जनमनावर असले तरी गणपतीच्या या दहा दिवसांत तो विचार बाजूला सारून गणपतीच्या सेवेत मग्न असलेल्या तारांकितांकडून त्यांच्या गणपतीच्या गोष्टी ‘लोकसत्ता’च्या ‘सेलिब्रिटींचा बाप्पा’ या खास सदरातून जाणून घेता येणार आहेत.

गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत ‘लोकसत्ता’च्या ‘सेलिब्रिटींचा बाप्पा’ या गणपती विशेष सदरात सेलिब्रिटींच्या घरी भेटी देऊन त्यांच्या बाप्पाच्या आठवणींविषयी त्यांना बोलते करणार आहोत. ‘महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ (एमआयडीसी) प्रस्तुत आणि ‘वाघ बकरी टी’ सहप्रायोजित ‘सेलिब्रिटींचा बाप्पा’ या सदरातून विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी आणि त्यांच्या बाप्पाची भेट घडणार आहे.

या दहा दिवसांत  सेलिब्रिटींकडचे गणपती, गणपतीसाठी त्यांनी केलेली आरास, त्यासाठी स्वत: घेतलेली मेहनत, घरच्यांचा सहभाग अशा विषयांवर आपण या सदरात गप्पा मारणार आहोत.

प्रस्तुत : ‘महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ (एमआयडीसी)

सहप्रायोजक : वाघ बकरी टी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 12:33 am

Web Title: ganpati darshan of stars from celebritys bappa abn 97
टॅग : Ganeshotsav
Next Stories
1 वाढीव वीजदेयकात सवलतीचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर
2 मुंबईत पुन्हा करोना रुग्णसंख्येत वाढ
3 ‘लोकसत्ता इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धा’
Just Now!
X