13 December 2017

News Flash

गणेशोत्सवात ‘तेजस’मध्ये मोदक

‘तेजस’च्या मेनूमध्ये गणेशोत्सव काळात उकडीचे मोदक उपलब्ध असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

प्रतिनिधी, मुंबई | Updated: August 12, 2017 2:50 AM

अत्याधुनिक वेगवान तेजस एक्स्प्रेसमध्ये गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना उकडीचे मोदक पुरवण्याचा निर्णय ‘आयआरसीटीसी’ने घेतला आहे.

‘तेजस’च्या मेनूमध्ये गणेशोत्सव काळात उकडीचे मोदक उपलब्ध असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कोकणात मोठय़ा संख्येने मुंबईतील नोकरदार रेल्वेने प्रवास करतात. या काळात ‘तेजस एक्स्प्रेस’चे बुकिंगही फुल्ल झाले आहे. त्या पाश्र्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवाशांना मेनू कार्डमध्ये मोदक उपलब्ध करून देऊन कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास अजून गोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. सुरुवातीला तेजस एक्स्प्रेसमध्ये पुरवण्यात येणाऱ्या खाण्याच्या मेनूवरून प्रवाशांनी रेल्वे प्रशासन व भारतीय रेल्वे कॅटरिंग सेवेवर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर आयआरसीटीसीने कोकणातील पदार्थाचा समावेश मेनू कार्डमध्ये केला आहे. तसेच त्यानंतर प्रवाशांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्याबाबतचा प्रस्ताव असून अंतिम निर्णय झाला नाही. गणेशोत्सव काळात सुरुवातीच्या दिवसांत मोदक मेनू कार्डमध्ये उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे, असे आयआरसीटीसीचे जनसंपर्क अधिकारी पिनाकिन मोरावाला यांनी सांगितले.

First Published on August 12, 2017 2:50 am

Web Title: ganpati festival 2017 tejas express modak