30 September 2020

News Flash

निरोप देतो आता देवा, आज्ञा असावी !

तब्बल दहा दिवस मनोभावे बाप्पांची पूजा केल्यानंतर लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला

गिरगाव चौपाटी

राज्यभरात मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं आहे. मागील १० दिवस ज्या बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा केली, त्या बाप्पाला निरोप देताना अनेकांना भावना अनावर झाल्या होत्या. पुणे आणि मुंबईत या मिरवणुकांना विशेष महत्त्व असून राज्यभरातील नागरिक  बाप्पाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी विसर्जन स्थळी गर्दी करत होते. पुण्यात मानाच्या पाच गणपतींनंतर इतर गणपतींचे विसर्जन केले जात आहे. सकाळी १०.३० च्या सुमारास मंडई येथून निघालेल्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे विसर्जन चार वाजण्याच्या सुमारास करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक खेळांचे सादरीकरण करत आपल्या लाडक्या बाप्पाला भाविकांनी निरोप दिला. तर मुंबईतही लालबागचा राजा, तेजुकायाचा गणपती, गणेशगल्लीचा राजा, परळचा राजा यांची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आल्या. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण मोठ्या उत्साहाने यात सहभागी झाल्याचे चित्र दिसत असून राज्यभरात या मिरवणुकांमध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवणयात आला.

Live Blog

Highlights

 • 07:11 (IST)

  दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन

  पुण्यातील बाप्पाच्या मिरवणुकांची धामधूम रात्रभर सुरू होती. शहरातील प्रसिद्ध अशा दगडूशेठ गणपती बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक रात्री अलका चौकातून पुढे आली. पहाटे ५च्या सुमारास या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.

 • 21:37 (IST)

  पुण्यात विसर्जनादरम्यान पाच जणांचा नदीत बुडून मृ्त्यू

  इंद्रायणी नदीत एका गणेश भक्ताचा बुडून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. देहूगाव येथे दुपारी ही घटना घडली. संदीप साळुंखे असे या १९ वर्षीय तरुणाचे नाव आहे. विसर्जन करताना तो नदीत पडला. उपस्थितांना शोधण्यात अपयश आल्यानंतर एनडीआरएफला पाचारण करण्यात आलं. तब्बल तीन तासांनी त्याचा शोध लागला. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच जुन्नर तालुक्यात गणपती विसर्जन करताना चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचे सुत्रांकडून कळते. कावळ पिंपरी येथे सायंकाळी ही घटना घडली. मुलांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 • 19:22 (IST)

  पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन; कुमठेकर रस्त्यावर डीजेला सुरुवात

  पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपती, दुसरा मानाचा तांडबी जोगेश्वरी, तिसरा मानाचा गुरुजी तालीम, चौथा मानाचा तुळशीबाग गणपती आणि पाचवा मानाचा केसरी वाडा गणपतीचे  विसर्जन पार पडले आहे. त्यानंतर आता पुढील मिरवणुकीला सुरुवात झाली असून कुमठेकर रस्त्यावरील बहुतेक मंडळांनी कोर्टाचा आदेश झुगारुन डीजेला सुरुवात केली आहे. दरम्यान, पोलिसांनी काही मंडळांना डीजे लावल्याप्रकरणी नोटीसा बजावल्या आहेत.

10:10 (IST)24 Sep 2018
लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान बुडाली बोट

लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान मोठा अनर्थ टळला आहे. गिरगाव चौपाटीवर विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली होती. मात्र वेळीच सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान महिलेसह एका मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

08:58 (IST)24 Sep 2018
तब्बल 22 तासानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन

तब्बल २२ तासानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं आहे. गिरगाव चौपाटीवर विसर्जन पाहण्यासाठी गणेशभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 

08:06 (IST)24 Sep 2018
पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल

डीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्याने पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

07:39 (IST)24 Sep 2018
लालबागचा राजा समुद्राच्या दिशेने रवाना

लालबागचा राजा समुद्राच्या दिशेने रवाना झाला असून थोड्याच वेळात विसर्जन होईल.

07:11 (IST)24 Sep 2018
दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन

पुण्यातील बाप्पाच्या मिरवणुकांची धामधूम रात्रभर सुरू होती. शहरातील प्रसिद्ध अशा दगडूशेठ गणपती बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक रात्री अलका चौकातून पुढे आली. पहाटे ५च्या सुमारास या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.

06:09 (IST)24 Sep 2018
लालबागच्या राजाची मिरवणूक गिरगावात दाखल

मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाची मिरवणूक आता गिरगावात दाखल झाली आहे. भाविक मोठ्या संख्येने आपल्या लाडक्या बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर अजूनही  उभे आहेत. जनसागराचा निरोप घेऊन जलसागरात विसर्जित होण्यासाठी आता लालबागचा राजादेखील सज्ज झाला असून 'पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष चौपाटीवर सुरु आहे.

04:22 (IST)24 Sep 2018
पुणे : प्रसिद्ध दगडूशेठ गणपती अलका चौकात

पुण्यातील बाप्पाच्या मिरवणुकांची धामधूम अद्यापही सुरूच आहे. शहरातील प्रसिद्ध अशा दगडूशेठ गणपती बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक सुरु असून आता बाप्पाची मिरवणूक अलका चौकात दाखल झाली आहे. असंख्य भक्त बाप्पाचे दर्शन घेत असून निरोप घेण्याआधी त्याची आठवण आपल्या मोबाईलमध्ये साठवून ठेवत आहेत.

03:42 (IST)24 Sep 2018
पुणे : अखिल मंडई गणपती मंडळाची मिरवणूक अलका चौकात

दिवसभराच्या मिरवणुकांनंतरही मंडळांचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या गणपतीची मिरवणूक पुढे सरकल्यानंतर आता अखिल मंडई गणपती मंडळाची मिरवणूक अलका चौकात दाखल झाली आहे.

02:38 (IST)24 Sep 2018
पुणे : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या गणपतीची मिरवणूक अलका चौकात

दिवसभर बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणूक सुरु आहेत. तसे असले तरीही अजूनदेखील भक्तांचा आणि मंडळांचा उत्साह जराही कमी झालेला नाही. आता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या गणपतीची मिरवणूक अलका चौकात दाखल झाली आहे.

00:14 (IST)24 Sep 2018
मुख्यमंत्री बाप्पाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर

मुख्यमंत्री फडणवीस बाप्पाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल. 

22:58 (IST)23 Sep 2018
मुख्य मंदिरापासून दगडूशेठ गणपतीचे प्रस्थान

बेलबाग चौकातील मुख्य मंदिरापासून दगडूशेठ गणपतीचे विसर्जनासाठी प्रस्थान झाले आहे. या गणपती मंडळाची मिरवणूक यंदा तीन तास लवकर निघाली असून पुण्यातील मिरवणूक यंदा लवकर संपेल असे सांगण्यात येत आहे. 

22:41 (IST)23 Sep 2018
पुणे : खडकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून पोलिसाला मारहाण

पुण्यातील एसपी कॉलेज परिसरात डीजे बंद करण्यावरुन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे. तर खडकी भागात डीजे बंद करायला सांगितल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून पोलिस नाईक थेटे यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत कार्यकर्त्यांनी शेटे यांच्या डोक्यात काठीने प्रहार केल्याने ते रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाले आहेत.

22:29 (IST)23 Sep 2018
पुणे : विश्रामबाग मित्र मंडळाचा डीजे बंदीविरोधात भोंगे, थाळ्या वाजवून निषेध

21:51 (IST)23 Sep 2018
मुंबई : 'परळचा राजा' विसर्जनासाठी चौपाटीवर दाखल

'परळचा राजा' विसर्जनासाठी चौपाटीवर दाखल (छाया : दिलीप कागडा)

21:45 (IST)23 Sep 2018
पुण्यात यंदा मिरवणुका नेहमीपेक्षा लवकर संपण्याची शक्यता

पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर इतर मंडळे विसर्जनासाठी मार्गस्थ होतात. त्यानुसार, प्रसिद्ध  दगडूशेठ हलवाई गणपती मध्यरात्रीनंतर २ वाजता बेलबाग चौकात येत असतो तो यंदा रात्री १० वाजता बेलबाग चौकात पोहचणार असल्याचे सुत्रांकडून कळते.  त्यामुळे विसर्जन मिरवणूक लवकर संपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

21:42 (IST)23 Sep 2018
पुणे : डेक्कन, कुमठेकर रोड,मंगळवार पेठ, दांडेकर पूल भागात डीजे जोरात

कोर्टाचे आदेश धुडकावून पुण्यातील डेक्कन, कुमठेकर रस्ता, मंगळवार पेठ आणि दांडेकर पूल या भागात अनेक गणेश मंडळांनी डीजे वाजवण्याला प्राधान्य दिले. अशा प्रकारे कोर्टाचे आदेश धुडकावणाऱ्या या मंडळांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर श्री गुरुदत्त तरुण मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट शिवाजीनगर येथील मंडळाने टाळ वाजवून आणि साऊंडवर भक्तगीतं लावून निर्णयाचा निषेध नोंदवला. तसेच विश्रामबाग मित्र मंडळाकडून डीजे निर्णयाचा निषेध, भोंगे आणि थाळ्या वाजून निषेध करण्यात आला.

21:37 (IST)23 Sep 2018
पुण्यात विसर्जनादरम्यान पाच जणांचा नदीत बुडून मृ्त्यू

इंद्रायणी नदीत एका गणेश भक्ताचा बुडून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. देहूगाव येथे दुपारी ही घटना घडली. संदीप साळुंखे असे या १९ वर्षीय तरुणाचे नाव आहे. विसर्जन करताना तो नदीत पडला. उपस्थितांना शोधण्यात अपयश आल्यानंतर एनडीआरएफला पाचारण करण्यात आलं. तब्बल तीन तासांनी त्याचा शोध लागला. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच जुन्नर तालुक्यात गणपती विसर्जन करताना चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचे सुत्रांकडून कळते. कावळ पिंपरी येथे सायंकाळी ही घटना घडली. मुलांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

21:19 (IST)23 Sep 2018
मुंबईत उत्साह शिगेला; तीनही चौपाट्यांवर गणेश विसर्जनासाठी गर्दी
20:24 (IST)23 Sep 2018
कोल्हापूरमध्ये विसर्जन मिरवणुकीत पोलिसांचा लाठीचार्ज

कोल्हापूरातील महाद्वार रोडवर गणपती विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना लाठीचार्ज करावा लागल्याचे वृत्त आहे. मिरवणूक पुढे नेण्यावरुन पोलिस आणि कार्यकर्त्यांचा वाद झाल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत. दरम्यान, यानंतर मिरवणूक पुढे सुरळीत सुरु झाली. 

20:01 (IST)23 Sep 2018
घरगुती गणपतींचे विसर्जन करताना पुणेकर
19:31 (IST)23 Sep 2018
वाहतुकीचे नियम पाळा : नाशिकमध्ये मिरवणुकीत मुलींचा हेल्मेट घालून सहभाग

गणेश विसर्जनाचा उत्साह राज्यभरात पहायला मिळत असून विविध प्रकारे लक्षवेधी आणि आकर्षक अशा विसर्जन मिरवणूका काढण्यात आल्या आहेत. या मिरवणूकांमध्ये पारंपारिक ढोल-ताशा पथकांचा उत्साही सहभाग आहे.  तसेच विविध सामाजिक संदेशही या मिरवणुकांमधून देणात येत आहेत. नाशिकमध्ये वाहतुकीचे नियम पाळा असा संदेश अनोख्या पद्धतीने देण्यात आला आहे. त्यासाठी नाशिक पोलिसांच्यावतीने एका मिरवणुकीत मुलींनी हेल्मेट घालून सहभाग नोंदवला आणि हेल्मेटची गरज प्रतिपादित केली.

19:22 (IST)23 Sep 2018
पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन; कुमठेकर रस्त्यावर डीजेला सुरुवात

पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपती, दुसरा मानाचा तांडबी जोगेश्वरी, तिसरा मानाचा गुरुजी तालीम, चौथा मानाचा तुळशीबाग गणपती आणि पाचवा मानाचा केसरी वाडा गणपतीचे  विसर्जन पार पडले आहे. त्यानंतर आता पुढील मिरवणुकीला सुरुवात झाली असून कुमठेकर रस्त्यावरील बहुतेक मंडळांनी कोर्टाचा आदेश झुगारुन डीजेला सुरुवात केली आहे. दरम्यान, पोलिसांनी काही मंडळांना डीजे लावल्याप्रकरणी नोटीसा बजावल्या आहेत.

19:15 (IST)23 Sep 2018
पुण्यातील मानचा पाचवा केसरी वाडा गणपतीचे विसर्जन

18:42 (IST)23 Sep 2018

पुण्याचा मानाचा चौथा गणपती तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे विसर्जन. 

18:33 (IST)23 Sep 2018

मुंबईचा राजा गणेशगल्लीचा गणपती गिरगाव चौपाटीवर दाखल. जनसागराचा निरोप घेऊन बाप्पा निघाले गावाला...

18:23 (IST)23 Sep 2018

मुंबईतील जुहू चौपाटीवर बाप्पांच्या विसर्जनासाठी भाविकांची गर्दी जमली आहे. गिरगाव, दादर चौपाटीनंतर उपनगरातील अनेक घरगुती आणि सार्वजनिक गणपतीचं विसर्जन जुहू चौपाटीवर केलं जातं.

17:43 (IST)23 Sep 2018

पुण्यातील मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालिम मंडळाच्या गणपतीचे विसर्जन 

17:22 (IST)23 Sep 2018

पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन

17:19 (IST)23 Sep 2018

श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी मंडळातर्फे लालबागच्या राजावर दरवर्षीप्रमाणे यंदाही पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. ( छाया सौजन्य : दिलीप कागडा)

17:03 (IST)23 Sep 2018

नागपूर : दहा दिवस बाप्पांची सेवा केल्यानंतर आता लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नागपूर येथेही घरगुती गणपतीच्या विसर्जनास सुरूवात झाली आहे. (छाया सौजन्य :मोनिका चतुर्वेदी)

16:54 (IST)23 Sep 2018

दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरावं यासाठी नाशिक इथल्या लेझिम अँड ढोल पथकातर्फे जनजागृती करण्यात आली. या पथकाद्वारे राबवण्यात आलेली मोहिम मिरवणुकीत अनेकांचं लक्ष वेधून घेत होती.

16:23 (IST)23 Sep 2018

पुण्याचे ग्रामदैवत मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे हौदात विसर्जन  

15:20 (IST)23 Sep 2018

पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती अलका टॉकीज चौकात दाखल, गणपतीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

15:08 (IST)23 Sep 2018

आर. के. स्टुडिओमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून गणेश मुर्तीची स्थापना केली जात आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी यावेळी कपूर कुटुंबातले सदस्य उपस्थित होते.

15:00 (IST)23 Sep 2018

 आर. के. स्टुडिओच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक, रणबीर कपूर आणि राजीव कपूर यांची मिरवणुकीला हजेरी

14:58 (IST)23 Sep 2018

लालबागच्या  राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी जमली आहे. 

14:37 (IST)23 Sep 2018

डीजेवर बंदी घातलेली असताना राज्यात अनेक मंडळांनी या निर्णयाला विरोध दर्शविला होता. पुण्यातील कुमठेकर रस्त्यावर गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे वाजवायला सुरुवात झाली आहे. 

14:19 (IST)23 Sep 2018

राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यनगरीतील मानाच्या गणपतींना निरोप देण्यासाठी अलका टॉकीज चौकात भव्य रांगोळी रेखाटण्यात आली आहे. संस्कार भारतीची ही रांगोळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहे. ज्येष्ठ नागरिकांवर होणारे अत्याचार रोखण्यायासाठी जनजागृती करण्यात आली आहे.

 

14:10 (IST)23 Sep 2018

मिरजेत मिरवणूक मार्गावर ११  स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. अखिल भारतीय  मराठा महासंघाच्या कमानीवर आरक्षण मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. 

14:03 (IST)23 Sep 2018

अनंत चतुर्दशी दरम्यान होणाऱ्या ठाण्याच्या गणपती विसर्जनावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे , महिला लहान मुलं , तरुण मुली यांच्या छेडछाडी करणाऱ्यांवर साध्या वेशातील पोलीस नजर ठेवणार आहेत. अतिसंवेदनशील परिसरात विसर्जन मिरवणुकीवर पहिल्यांदाच ड्रोनची नजर राहणार आहे

13:31 (IST)23 Sep 2018

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या बाहेर आणतानाची ड्रोन कॅमेराने टिपलेली नयनरम्य दृश्ये

13:28 (IST)23 Sep 2018

मानाच्या आणि मोठ्या गणपतींबरोबरच घरगुती गणपतींचेही राज्यभरात विसर्जन 

 

13:19 (IST)23 Sep 2018

पाहा मुंबई गणेश विसर्जन मिरवणुकीची काही निवडक क्षणचित्रे एका क्लिकवर

https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/1757945/mumbai-ganapati-visarjan-2018-anant-chaturdashi-lalbaugcha-raja-ganesh-galli-visarjan-miravnuk/

13:15 (IST)23 Sep 2018

सांगलीतल्या मिरज इथल्या शिवसेनेच्या स्वागत कमानीवर होर्डिंग लावून भाजपवर टीका करण्यात आली आहे.

13:02 (IST)23 Sep 2018

कोल्हापूरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत महापौर शोभा बोंद्रे यांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सुरक्षारक्षक आणि पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर :

https://www.loksatta.com/maharashtra-news/kolhapur-mayor-shobha-bondre-assaulted-by-chandrakant-patils-bodygaurd-during-ganesh-visarjan-miravnuk-1757928/

12:41 (IST)23 Sep 2018

पाहा 'परळच्या राजा'च्या विसर्जन मिरवणुकीचा थाट

12:32 (IST)23 Sep 2018

परळच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. 

12:18 (IST)23 Sep 2018

दहा दिवसांच्या मंगलमय वातावरणात गणेशोत्सव साजरा केल्यानंतर आज अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला निरोप द्यायची वेळ आली आहे. पाहा पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींच्या विसर्जनाचा थाटhttps://www.loksatta.com/photos/todays-photo-3/1757922/ganapati-visarjan-2018-pune-ganapati-visarjan-miravnuk-anant-chaturdashi/

12:12 (IST)23 Sep 2018

मुंबई येथील राजा तेजुकायाचा गणपती मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक उपस्थित. ढोल ताशांच्या गजरात बाप्पांच्या मिरवणुकीला सुरूवात झाली आहे.

12:04 (IST)23 Sep 2018

विसर्जन मिरवणुकीत महापौरांना महसूलमंत्र्याच्या बॉडीगार्डकडून धक्काबुक्की

https://www.loksatta.com/maharashtra-news/kolhapur-mayor-shobha-bondre-assaulted-by-chandrakant-patils-bodygaurd-during-ganesh-visarjan-miravnuk-1757928/

Next Stories
1 ‘युद्धासाठी आम्ही सज्ज, पण नागरिकांच्या हितासाठी शांत’ ; बिपिन रावत यांना पाकचं प्रत्युत्तर
2 ‘आयुष्मान भारत योजने’चा आज शुभारंभ, जाणून घ्या काय आहे खास?
3 विघ्न कायम ! पेट्रोल-डिझेलची शतकाकडे आगेकूच
Just Now!
X