गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची आज, गुरुवारी सांगता होत आहे. त्यानिमित्ताने मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागांतील विसर्जन मिरवणुकांचे थेट वार्ताकन वाचकांना ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर तसेच मोबाइलवर पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संकेतस्थळावरील लाइव्ह ब्लॉग, फोटो गॅलरी आणि व्हिडीओच्या माध्यमातून वाचक कुठूनही विसर्जन मिरवणुकीची माहिती मिळवू शकतील. मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’च्या विसर्जन मिरवणुकीचे ‘लाइव्ह स्ट्रीमिंग’ही संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
त्याचबरोबर ‘फेसबुक’वरील लाइव्ह व्हिडीओच्या साह्य़ाने मुंबई आणि पुण्यातील विविध गणेश मंडळांच्या मिरवणुकांचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल. विसर्जन मिरवणुकीचा सोहळा अनुभवण्यासाठी भेट द्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 15, 2016 12:59 am