News Flash

मुंबईतील अनेक भागांतून गॅस गळतीच्या तक्रारी

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

फोटो: प्रशांत नाडकर

मुंबईतील अनेक ठिकाणांहून गुरूवारी रात्री गॅस गळतीच्या तक्रारी आल्याची माहिती समोर आली आहे. मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, पवई, हिरानंदानी, चकाला अशा अनेक ठिकाणांहून गॅस गळतीच्या तक्रारींचे फोन अग्निशमन दलाला करण्यात आले. दरम्यान, या तक्रारींची दखल घेतल अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसंच गॅस गळती नेमकी कोणत्या ठिकाणी होत आहे याचा शोध घेण्याचे काम सध्या सुरू आहे.

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरातून गॅसचा दुर्गध येत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या असल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आले. संबंधित यंत्रणांना पालिकेने याबाबत माहिती दिली आहे. तसंच अग्निशमन दलाच्या 9 गाड्या गॅस गळती कोणत्या ठिकाणाहून होत आहे, याचा शोध घेण्यासाठी पाठवल्या असून अधिक माहितीसाठी 1916 वर संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरच्या चेंबूर प्लांटमध्ये गॅस गळती झाल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. परंतु त्यामध्ये गळती झाली नसल्याचे ट्विटही पालिकेकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, गॅस गळती संदर्भात अनेकांनी महानगर गॅस लिमिटेडकडेही तक्रारी नोंदवल्या होत्या. गुरूवारी संध्याकाळपासून गॅसचा दुर्गंध येत असल्याच्या तक्रारी मुंबईच्या अनेक भागांतून आम्हाला मिळत होत्या. आपात्कालिन परिस्थितीत काम करणाऱ्या टीमना त्यानंतर त्वरित पाचारण करण्यात आलं. सध्या गॅसच्या पाईपलाईनमध्ये गळती नसल्याची माहिती मिळाली असल्याचे, महानगर गॅसकडून सांगण्यात आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 7:41 am

Web Title: gas leakage complaint received from various parts of mumbai mcgm mahanagar gas limited jud 87
Next Stories
1 पावसाची हुलकावणी, सुट्टीचा गोंधळ मात्र कायम
2 मेट्रो-३ची कारशेड आरेतच!
3 रोजगाराभिमुखतेनुसार विद्यापीठांच्या क्रमवारीत आयआयटी मुंबई अव्वल
Just Now!
X