‘गाथा महाराष्ट्राची’ उपक्रमाचा समारोप उद्या अरुणा ढेरे यांच्या व्याख्यानाने

मुंबई : शाळेत जायला लागल्यापासून प्रत्येकाच्या आयुष्यात कवितेचाही प्रवेश होतो. अनेक जण काव्याच्या या तरल प्रदेशात हरखून जातात, काही जण कवीही होतात. कवितेच्या प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला मराठी कवितेच्या समृद्ध परंपरेचा धांडोळा घ्यावा, असे वाटतेच. त्यासाठी येत्या शुक्रवारी, दि. १४ मे रोजी ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या ६१ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘लोकसत्ता’च्या वतीने ‘गाथा महाराष्ट्राची’ या वेब व्याख्यानमालेचे आयोजन केले असून त्याचा समारोप डॉ. ढेरे यांच्या व्याख्यानाने होणार आहे. ‘मराठी कवितेची परंपरा’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय असून ते सायंकाळी सहा वाजता झूमद्वारे ऐकता येणार आहे.

माधव ज्यूलिअन, सुरेश भट, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, इंदिरा संत, बा. सी. मर्ढेकर, ग्रेस, पु. शि. रेगे अशी कितीतरी नावे जरी आठवली, तरी साहित्य समृद्धीची अपूर्वाई जाणवू लागते. या परंपरेतील महत्त्वाचे टप्पे समजावून घेत, मराठी कवितेच्या प्रांतात मुशाफिरी करण्याची ही संधी खास ‘लोकसत्ता’ वाचकांसाठी मिळणार आहे.

प्रस्तुती : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)

सहप्रायोजक : सारस्वत को-ऑपरेटिव्ह

बँक लि. आणि मे. बी. जी. चितळे डेअरी

पॉवर्ड बाय : मांडके हिर्अंरग

सर्व्हिसेस, पुणे</strong>

सहभागासाठी क्यूआर कोडही स्कॅन करता येईल.

http://tiny.cc/LS_Maharashtra_Gaatha

येथे नोंदणी आवश्यक.