27 May 2020

News Flash

समाजमाध्यमांत गझल बहर!

भीतीच्या धगीतही अनेकांच्या प्रतिभेला बहर आलाय.

संग्रहित छायाचित्र

मधु कांबळे

करोना विषाणूमुळे बाहेर कधी नव्हे इतका सन्नाटा पसरला आहे. संपूर्ण मानवजातीवरच भिती, दहशतीचे ढग आच्छादलेले आहे. घरात कोंडून घेणे सक्तीचे झाले आहे. हे कधी संपणार, ही धडधड मनात असली तरी, करोनाला पराभूत करण्यासाठी घरातच बसा, बाहेर जाऊ नका, या करोनात किती दम आहे बघू, जग जिंकायला निघालेला सिंकदरही या भारताच्या मातीतच हरला, असा संदेश, असा धीर देणारी गझल मैफल समामाध्यमांवर रंगते आहे. भीतीच्या धगीतही अनेकांच्या प्रतिभेला बहर आलाय.

एक घर उभं करण्यासाठी माणूस आपले आयुष्य वेचतो, त्याच

घरात त्याला आज रहावेना. त्याचेच घर त्याला कोंडवाडा वाटू लागला आहे.

कमाल है..

जिस घर को बनाने में जिंदगी लगा दी.

आज उसी घर में रहने से बेचैन है इन्सान..

हा सन्नाटा पहा..

घर गुलजमर, सूने शहर,

बस्ती बस्ती में कैद हर हस्ती हो गई

जीवनाची गतीच आज गोठून गेल्यासारखी झाली आहे. तुमच्याकडील धनदौलतीला आज काहीही किंमत नाही, पण जगणे महाग झाले आहे. त्यावरची टिप्पणी..

आज फिर जिन्दगी महँगी

और दौलत सस्ती हो गई

करोना म्हणजे जीवघेणा विषाणू आहे, त्याच्याशी पंगा घेऊ नका. कारण नसताना घराबाहेर जाण्याची काय गरज आहे. मृत्यूच्या नजरेला नजर भिडवण्याची चूक कशाला करता, हेही बजावले जाते..

बेवजह घर से निकलने की ज़्‍रूरत क्या है

मौत से आंख मिलाने की ज़्‍रूरत क्या है

सबको मालूम है बाहर की हवा है कातिल

यूँ ही कातिल से उलझने की ज़्‍ारूरत क्या है

जिन्दगी एक नियामत है, इसे सम्हाल के रखे

श्मशानों को सजाने की ज़रूरत क्या है

दिल बहलने के लिए घर मे वजह हैँ काफी

यूँ ही गलियों मे भटकने की ज़्‍ारूरत क्या है

असा काळ, असा प्रसंग माणसाच्या आयुष्यात कधी तरी येतो, हा कालखंडही निघून जाईल, पण थोडा धीर धरण्याचा संदेशही आहे.

बडे दौर गुजरे हैं जिंदगी के,

यह दौर भी गुजर जायेगा!

थाम लो अपने पांव को घरों में.

ये मंज़्‍र भी थम जाएगा..

पुन्हा पुन्हा तीच विनवणी केली जाते, बाबांनो घरातून बाहेर पडू नका..

तूफमन के हालात है ना किसी सफर में रहो..

पंछियों से है गुज़ारिश अपने शहर में रहो..

ईद के चाँद हो अपने ही घरवालो के लिए..

ये उनकी खुशकिस्मती है उनकी नज़्‍ार में रहो..

माना बंजारों की तरह घूमे हो डगर डगर..

वकत का तकमज़ा है अपने ही शहर में रहो..

तुम ने खाकम् छानी है हर गली चौबारे की.

कुछ दिन की तो बात है अपने घर में रहो.

करोना विषाणूपासून जीव वाचवण्यासाठी आज देशभर संचारबंदी लागू केली आहे. पण गेले वषर्भर काश्मीरमधील जनतेचे जीवन कर्फ्यूने बंदिस्त केले आहे. कर्फ्यूच्या वेदना, यातना घुसमट काय असते, त्याचीही आठवणीर करून दिली जात आहे..

कर्फ्यू है एहतियात से रहिएगा

पानी कम गिराइएगा, नमक कम खाईएगा।

जाफरान की भी चाय बनाई जा सकती है

आटे में नमक डाल कर

पानी उबालकर भी रोटी खाई जा सकती है।

माँ जी की दवाई खम्त्म हो तो

पानी में हल्दी घोलने से आराम आएगा।

अब्बा जी को गुनगुना घी गुटनो में लगाइएगा।।

करोनाच्या आक्रमणाला आव्हान देणार्या कविताही समाजमाध्यमांवर मोठय़ा प्रमाणावर संचारू लागल्या आहेत. त्यातून भयभीतांना दिलासा दिला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2020 1:05 am

Web Title: gazal blossoms in the media abn 97
Next Stories
1 शिधावाटप दुकानांमध्ये ३० टक्केच धान्यसाठा
2 अंगणवाडीतील ७३ लाख बालके उपाशी!
3 ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज
Just Now!
X