उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर फेब्रुवारीच्या अखेरीस स्फोटकं असलेली कार आढळून आली होती. या घटनेनं सगळीकडेच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू असून, अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसह जप्त करण्यात आली. मात्र यासोबतच एक पांढरी इनोव्हा होती. त्या इनोव्हाचं कोडं अजूनही सुटलेलं नाही. पांढऱ्या इनोव्हाची माहिती काढताना पोलिसही चक्रावले आहेत. आतापर्यंत तब्बल ८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासलं आहे. मात्र, अद्याप हाती काहीच लागलेलं नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ गुरुवारी (२५ फेब्रवारी) मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी स्कॉर्पिओ कार बेवारस अवस्थेत सोडली होती. या कारमध्ये सुमारे अडीच किलो वजनाच्या जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला होता. ‘मुंबई इंडियन्स’ लिहिलेल्या बॅगेत अंबानी कुटुंबीयांना धमकी देणारी चिठ्ठीही सापडली. या संपूर्ण प्रकरणात स्कॉर्पिओसह इनोव्हा कार सहभागी होती. यापैकी स्कॉर्पियो कार १७ फेब्रुवारीच्या रात्री मुलुंड उड्डाणपुलाजवळून(ऐरोलीकडे जाणाऱ्या मार्गावरील) चोरण्यात आली. तर इनोव्हा कारवरील नोंदणी क्रमांक बनावट असल्याचे स्पष्ट झाले होतं.

या प्रकरणाचा तपास एसीपी नितीन अलकनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. तपास सुरू केल्यानंतर पोलिसांकडून पांढऱ्या इनोव्हाबद्दल माहिती काढण्याचं काम हाती घेण्यात आलं. आतापर्यंत पोलिसांनी ८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आहे. त्याचबरोबर ३० पेक्षा अधिक लोकांचे जबाब नोंदवले असून, आतापर्यंत त्या पांढऱ्या इनोव्हाबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही माहिती दिली आहे.

स्कॉर्पिओ ठाण्यातील व्यक्तीची

पोलिसांनी केलेल्या तपासातून स्कॉर्पियो कार ही ठाण्यात राहणारे ऑटोमोबाइल व्यावसायिक हिरेन मनसुख यांची आहे. टाळेबंदीत ही कार वर्षभर बंद होती. ती दुरुस्त करून विकण्याचा मनसुख यांचा विचार होता. ही कार घेऊन ते १७ फेब्रुवारीला ऑपेरा हाऊस येथे निघाले होते. मात्र स्टेअरिंग जाम झाल्याने त्यांनी ही कार उड्डाणपुलाजवळ सोडली. रात्री परत आले तेव्हा ही कार तेथे नव्हती. याप्रकरणी त्यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात कार चोरीची तक्रार नोंदवली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gelatin car parked outside mukesh ambanis residence no info regarding white innova received bmh
First published on: 03-03-2021 at 14:37 IST