02 March 2021

News Flash

मुंबई महापालिकेच्या गैरकारभाराने घेतला एका महिलेचा जीव …..

कंत्राटदार आणि महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबईतील घाटकोपरमध्ये गटारात पडून एक महिला वाहून गेली. तिचा मृतदेह आज पहाटे ३ च्या सुमारास थेट हाजी अली समुद्र किनारी आढळला. शीतल भानुशाली असं या ३२ वर्षीय महिलेचं नाव होतं.

वॉर्ड क्रमांक १६० शिवाजीनगर, असल्फा व्हिलेज, घाटकोपर या ठिकाणी परवा संध्याकाळी ६.३० ते ७ दरम्यान झालेल्या मुसळधार पावसात आमच्या विभागात राहणारी महिला सौ.शीतल  ही गटारात पडून वाहून गेली. सदरच्या गटारांवर पूर्वी सिमेंट चे ढापे बसवलेले होते मात्र जानेवारी दरम्यान गटारांचे दुरूस्तीचे काम केल्यावर त्यावर निकृष्ट दर्जाचे ढापे बसवले होते.

कालपासून अग्निशमन दल पोलीस महिलेचा शोध घेत होते परंतु या महिलेचा मृतदेह आज पहाटे ३ वाजता वरळीतील नाल्यात सापडला आहे, त्या महिलेला २ वर्षाची मुलगी व ६ वर्षाचा मुलगा आहे. मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे ती दोन लहान लेकरं आईला मुकली आहेत. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संताप आहे. गटाराचे काम करणारा कंत्राटदार व महापालिका अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी रहिवासी करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2020 3:46 pm

Web Title: ghatkoper woman fallen in the manhole dead body found at haji ali seashore scj 81
Next Stories
1 ‘राजसाहेब परप्रांतीय मासे विक्रेत्यांना हटवा’ची मागणी करत कोळी भगिनी कृष्णकुंजवर
2 भाजपाचा सीबीआयवरही विश्वास उरला नसेल तर काय बोलणार? -संजय राऊत
3 इमारती पुनर्विकासासाठी ७० हजार कोटींची गरज!
Just Now!
X