News Flash

‘घोळात घोळ’ चे रंगभूमीवर पुनरागमन

दिवंगत अभिनेते बबन प्रभू आणि फार्स यांचे अतूट असे नाते होते. बबन प्रभू यांचे नाव घेतले की ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘दिनूच्या सासुबाई राधाबाई’ अशी

| October 19, 2013 01:31 am

दिवंगत अभिनेते बबन प्रभू आणि फार्स यांचे अतूट असे नाते होते. बबन प्रभू यांचे नाव घेतले की ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘दिनूच्या सासुबाई राधाबाई’ अशी गाजलेली फार्सिकल नाटके आठवतात. याच यादीत ‘घोळात घोळ’ या फार्सचाही आवर्जून उल्लेख केला पाहिजे. काही वर्षांपूर्वी गाजलेले हे नाटक नुकतेच नव्या संचात पुन्हा एकदा रंगभूमीवर दाखल झाले आहे. दिग्दर्शक विजय केंकरे दिग्दर्शित करत असलेले हे ५१ नाटक असून या निमित्ताने त्यांनी ‘फार्स’ हा प्रकार हाताळला आहे. अभिनेते रमेश भाटकर या नाटकात पहिल्यांदाच एका विनोदी भूमिकेत असून नाटकात संजय नार्वेकर, हेमंत ढोमे, विजय पटवर्धन, रसिका आगाशे, रुई पवार, नेहा कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. राजन भिसे यांचे नेपथ्य असून निर्माते संतोष शिदम यांच्या ‘मल्हार’ या संस्थेतर्फे हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसविण्यासाठी सादर झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2013 1:31 am

Web Title: gholat ghol play return to the stage
टॅग : Marathi Play,Stage
Next Stories
1 जिल्ह्यचा २४० कोटींचा कृती आराखडा मंजूर
2 मुंबै बँकेतील घोटाळा खणून काढा; तावडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
3 तटकरेंविरोधात तपास न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
Just Now!
X