News Flash

मुंबईच्या कलाविश्वाचं खरं माहेरघर… आपलं गिरगाव!

या कलाकारांनी गिरगावात आपली कला जोपासली, वाढवली. अनेक कलाकार इथं घडले व त्यांनी इतरांना घडवलं.

मुंबईचं आर्ट डिस्ट्रीक्ट कुठे आहे? असा प्रश्न विचारला तर उत्तर येईल जहाँगीर आर्ट गॅलरी असलेला काला घोडा परीसर. मात्र मुंबईत असा एक भाग आहे जो आधी मुंबईतल्या कलेचं माहेरघर होता. या भागाचं नाव आहे… गिरगाव. ठाकूरद्वारपासून ते बाबुलनाथ आणि चौपाटीपासून ते ग्रँट रोड या पट्ट्यामध्ये कलाविश्वातील अनेक दिग्गजांनी इतिहास रचला. त्यातले काही नामवंत अजुनही रसिकांच्या स्मरणात आहेत तर अनेकजणं आता विस्मृतीत गेले आहेत. या कलाकारांनी गिरगावात आपली कला जोपासली, वाढवली. अनेक कलाकार इथं घडले व त्यांनी इतरांना घडवलं.

या गिरगावच्या कलाविश्वातली सोनेरी पानं एका टॉकच्या माध्यमातून रसिकांसाठी सादर करण्यात येत आहेत. खाकी टूर्स व लोकसत्ता डॉट कॉम आयोजित या टॉकमध्ये खाकी टूर्सचे संस्थापक भरत गोठोसकर गिरगावच्या कला व संस्कृतीचा वारसा उलगडून दाखवणार आहेत.

या टॉकमध्ये, चित्रकला, शिल्पकला… संगीतापासून नाट्यगृहापर्यंत आणि चित्रपट निर्मितीसह अनेक क्षेत्रं गाजवणाऱ्या कलाकारांच्या कथा गोठोसकरांकडून ऐकण्याची संधी मिळणार आहे.

कधी – शनिवारी रात्री आठ वाजता

कुठे – झूम अ‍ॅपवर

सहभागी कसं व्हायचं – https://bit.ly/3eqdj91 या लिंकवर क्लिक करुन करा रजिस्ट्रेशन

प्रवेश – मर्यादित रसिकांसाठी… मोफत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 9:51 am

Web Title: girgaon a hub of art in mumbai talk by khaki tours bharat gosatkar scsg 91
Next Stories
1 दुसऱ्या लाटेचा तरुणवर्गाला मोठा तडाखा
2 अंधेरी-विरार प्रकल्प पूर्ण
3 ‘मेट्रो ३’ चा ३७वा टप्पा पूर्ण
Just Now!
X