News Flash

‘ते’ सुखरूप परततील..!

खटाववाडी चाळीतील बैकर कुटुंब महाड दुर्घटनेत बेपत्ता

सुनील आणि स्नेहल बैकर

गिरगावकरांचा आशावाद; खटाववाडी चाळीतील बैकर कुटुंब महाड दुर्घटनेत बेपत्ता

एरवी गिरगावातील खटाववाडी चाळ तशी गजबजलेली.. लहान लहान खोल्यांतून आनंदाचे प्रसंग एकमेकांना मोठय़ा ‘आवाजा’त वाटण्याची इथली जणू पद्धतच. मात्र मंगळवारी झालेल्या घटनेनंतर गिरगावातील ही चाळ मुकी झाल्यासारखी वाटत होती. खोली क्रमांक आठमधील स्नेहल आणि सुनील यांचा पत्ता बारा तासांनंतरही लागत नव्हता.

गेल्या अनेक वर्षांपासून बैकर कुटुंबीय आमच्या शेजारी राहतात. नातेवाईकांपेक्षाही ते आमच्या जवळचे, एका अर्थी घरातले आहे. हा प्रसंग शेजारच्या घरात घडला असला असली तरी तो आमच्याच कुटुंबावर ओढावला आहे, याची सारखी जाणीव होत आहे. घरातली सगळी माणसे वाटेला डोळे लावून बसलोय. असे वाटतेय, आता येतील. सुनील आणि स्नेहलचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले. दोघेही नेहमी आनंदीच असायचे. सगळ्यांची काळजी करायची हा त्यांचा स्वभाव असल्याचे बैकर यांच्या शेजारी प्राची शिंदे यांनी सांगितले. तर दीपाली आणि स्नेहल बैकर या दोघी बहिणी वडिलांच्या निधनानंतर कार्याचा विधी संपवून परतत असतानाच ही घटना घडली. परतीच्या प्रवासात स्नेहल यांच्यासोबत त्यांची बहीण, पती सुनील बैकर, अकरा वर्षांचा भाचा अनिश बळेकर आणि त्यांच्या गावातील अविनाश मालप हे प्रवास करत होते. मात्र, ज्या जयगड-मुंबई एसटीने ते परतत होते. तीच एसटी  बेपत्ता झाल्याचे कळले. हा घटनेला प्रशासन जबाबदार आहे. झालेल्या घटनेला १५ तासांहून अधिक काळ उलटून गेला आहे. मात्र अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. परंतु ‘ते’ सुखरूप परततील, अशी भावना बैकर यांचे नातेवाईक अमोल भाताडे यांनी व्यक्त केल्या.

माझे आजोबा भिकाजी वाघधरे यांनी मंगळवारी रात्री लांजा येथून आमच्या नातोवाईकांना भ्रमणध्वनीरून संपर्क साधला होता. आणि आपण राजापूर-बोरिवली या गाडीने येत असल्याची कल्पना दिली. कलमाची झाडे लावण्यासाठी दोन दिवसांपूर्वी ते गावी गेले होते. बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ते बोरिवलीत दाखल होणार होते. मात्र एसटी गाडय़ा बेपत्ता झाल्याचे समजले.

– स्वाती कलगुटकर, भिकाजी वाघधरे यांची नात

विजय पंडित आणि विनिता पंडित सोनगिरी येथून मंगळवारी मुंबईला येण्यासाठी निघाले. मात्र त्यानंतर रात्रीच त्यांच्याशी संपर्क तुटला. वारंवार संपर्क साधूनही काहीच संपर्क होत नसल्याने चिंता वाढली. मात्र काही तासांनी महाडला काही घटना घडली आहे, हे समजताच आम्ही घटनास्थळी रवाना झालो. मात्र दिवसभरात कोणतीच माहिती मिळाली नाही. लवकर त्यांची माहिती मिळू दे.

– विजय गोविंद पवार, विनिता पंडित यांचा चुलत भाऊ

राज्य परिवहन महामंडळ हेल्पलाइन क्रमांक :०२१४१-२२२११८

टोल फ्री क्रमांक रायगड जिल्हा नियंत्रण कक्ष. १०७७

मुंबई सेंट्रल बसस्थानक – ०२२-२३०७४२७२, २३०७६६२२,

महाड बस स्थानक- ०२१४५-२२२१३९, २२२१०२,

पोलादपूर बसस्थानक  ०२१९१- २४००३६, चिपळूण बसस्थानक

०२३५५- २५२००३, २५२१६७,

रत्नागिरी बसस्थानक

०२३५२- २२२१०२, २२२५३,

राजापूर बसस्थानक

०२३५३- २२२०२९, २२२२१८

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 2:41 am

Web Title: girgaon family missing in mumbai goa highway bridge collapses
Next Stories
1 ५० मीटर अंतरावरील मृत्यू टळला..
2 कजबुज.. ; अशीही अडचण
3 अखंड महाराष्ट्रावरून मुख्यमंत्र्यांची भूमिका दुटप्पी!
Just Now!
X