News Flash

गिरगावमधील इमारतीमध्ये भीषण आग

निवासी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सकाळी साडे अकराच्या सुमारास भीषण आग लागली.

गिरगावमधील इमारतीमध्ये भीषण आग
प्रतिकात्मक छायाचित्र

गिरगावमधील कुंभार गल्ली येथील इमारतीमध्ये बुधवारी सकाळी भीषण आग लागली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली असून आत्तापर्यंत आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

गिरगावमधील मारुती मंदिर रोड येथे मोची बिल्डिंग असून या निवासी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सकाळी साडे अकराच्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून अद्याप आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2019 12:00 pm

Web Title: girgaon fire at residential building kumbhar galli fire tender on spot
Next Stories
1 मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
2 कचरा फेकणाऱ्यांवर खटले
3 अधुऱ्या स्वप्नाची अखेर
Just Now!
X