02 December 2020

News Flash

मुखपट्टी नसल्यामुळे गिरीश महाजन यांना दंड

आपल्याकडून चूक झाल्यामुळे गिरीश महाजन यांनी कुरकुर न करता २०० रुपये दंड भरला

(संग्रहित छायाचित्र)

मलबार हिलच्या तीन बत्ती परिसरातील एका औषधाच्या दुकानातून एक व्यक्ती बाहेर पडली. चेहऱ्यावर मुखपट्टी नसल्याने तेथे तैनात असलेल्या पालिका कर्मचाऱ्याने त्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. पण ही व्यक्ती माजी मंत्री गिरीश महाजन असल्याचे कळताच पालिका कर्मचाऱ्याची बोबडी वळली. मात्र आपल्याकडून चूक झाल्यामुळे गिरीश महाजन यांनी कुरकुर न करता २०० रुपये दंड भरला आणि पालिका कर्मचाऱ्याने सुटकेच्या निश्वास सोडला.

पालिकेने कारवाईसाठी नियुक्त केलेले कर्मचारी मलबार हिल परिसरातील तीन बत्ती भागात तैनात होते. औषधांच्या दुकानातून बाहेर पडलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मुखपट्टी नसल्याने कर्मचारी कारवाईसाठी सरसावले. मुखपट्टी नसल्याची बाब कर्मचाऱ्यांनी त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीने ते माजी मंत्री गिरीश महाजन असल्याचे सांगताच पालिका कर्मचाऱ्याला घाम फुटला. मात्र, महाजन यांनी आपल्याकडून चूक झाली आहे. त्यामुळे दंड घ्यावा, असे त्याला सूचित केले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 10:21 am

Web Title: girish mahajan fined for not covering face abn 97
Next Stories
1 रुग्णालयाच्या शौचालयात १४ दिवस करोना रुग्णाचा मृतदेह होता पडून; मुंबईतील धक्कादायक घटना
2 मुंबई सेंट्रलमधील आग ३५ तासांनंतरही धुमसतीच; आदित्य ठाकरेंची घटनास्थळी भेट
3 परीक्षा घेण्याच्या सूचना नसल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे शाळांना पत्र
Just Now!
X