News Flash

बालिकेला चिरडले

भिवंडी येथील संगमपाडा भागात बुधवारी सायंकाळी रस्त्याच्या कडेला बसलेल्या सहा वर्षीय बालिकेला भरधाव कारने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर संतप्त जमावाने बेदम

| February 14, 2013 04:26 am

भिवंडी येथील संगमपाडा भागात बुधवारी सायंकाळी रस्त्याच्या कडेला बसलेल्या सहा वर्षीय बालिकेला भरधाव कारने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर संतप्त जमावाने बेदम मारहाण केल्याने कारचालक जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला उपचारासाठी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोशनी यादव  असे या बालिकेचे नाव असून ती संगमपाडा भागात राहत होती. बुधवारी सायंकाळी ती परिसरातील रस्त्याच्या कडेला शौचास बसली होती. त्या वेळी शेलार येथील कपडा डाइंगमधील काम आटपून अनिल जैन हे आईसोबत कारने घरी परतत असताना त्यांच्या कारची तिला धडक बसली. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 4:26 am

Web Title: girl child squashed
Next Stories
1 महाविद्यालयातील विद्यार्थिनींची दबंगगिरी
2 सात वर्षांच्या मुलीस कोंडून ठेवल्याप्रकरणी चौघांना अटक
3 मलनि:सारण वाहिनी साफ करणाऱ्या तीन कामगारांना वायुबाधा
Just Now!
X