News Flash

घाटकोपर मेट्रो स्थानकात तरुणीची आत्महत्या

मेट्रो स्थानकाच्या स्वच्छतागृहात एका तरुणीने मंगळवारी रात्री विषप्रशान करुन आत्महत्या केली.

मुंबई मेट्रो.

घाटकोपर मेट्रो स्थानकात तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मेट्रो स्थानकाच्या स्वच्छतागृहात एका तरुणीने मंगळवारी रात्री विषप्राशन करुन आत्महत्या केली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तरुणी साकीनाका येथील रहिवाशी असून, मेट्रो स्थानकावरील कर्मचाऱयांना स्वच्छतागृहात ती विषप्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आली. कर्मचाऱयांनी तिला तात्काळ नजीकच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2015 9:02 am

Web Title: girl committed suicide at ghatkopar metro station
Next Stories
1 माहितीसाठी हेलपाटे घालायला लावणाऱ्या पालिका अभियंत्याला दंड
2 डिजिटल डॉक्टरांना वाढती मागणी
3 सात कोटी खर्च करूनही श्वानांची संख्या कायमच
Just Now!
X