25 September 2020

News Flash

ठाण्यात धावत्या रिक्षातून मुलींची उडी

स्वप्नाली लाड तरुणीच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगाला सहा महिने उलटत नाहीत, तोच ठाण्यात पुन्हा एकदा याच प्रकाराची आठवण करून देणारी घटना रविवारी रात्री घडली.

| March 3, 2015 04:15 am

स्वप्नाली लाड तरुणीच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगाला सहा महिने उलटत नाहीत, तोच ठाण्यात पुन्हा एकदा याच प्रकाराची आठवण करून देणारी घटना रविवारी रात्री घडली. रत्नागिरीहून  कार्यक्रमासाठी ठाण्यात आलेल्या दोन तरुणींनी रिक्षाचालकाचे अश्लील हावभाव पाहून बचावासाठी रिक्षातून उडी मारली. या घटनेत दोघी जखमी झाल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी रिक्षाचालक फूलचंद गुप्ता याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे ठाणे शहरातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
 रत्नागिरीतील दोन तरुणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यां आहेत. कळव्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी या दोघी ठाण्यात आल्या होत्या.  त्यापैकी एकीच्या  भिवंडीतील काकाकडे जाण्यासाठी त्या दोघी नौपाडा परिसरात त्या रिक्षात बसल्या, तेव्हा चालकाने रिक्षाच्या आरशामध्ये पाहून त्यांच्याकडे अश्लील हावभाव केले. यामुळे या दोघींनी त्याला रिक्षा थांबविण्यास सांगितले; पण त्याने रिक्षाचा वेग वाढविला आणि कॅडबरी उड्डाणपुलावरून वेगाने रिक्षा नेऊ लागला. त्यामुळे या दोघींनी धावत्या रिक्षातून उडी मारण्याचे ठरविले. आणि लगेच एकापाठोपाठ दोघींनी उडी घेतली. या अपघातात त्या किरकोळ जखमी झाल्या. या प्रकरणी प्रथम वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

रिक्षाचालक ताब्यात
रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून त्याचप्रमाणे पीडित तरुणींनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मानपाडा येथे राहणाऱ्या फूलचंद गुप्ता या संशयित रिक्षाचालकाला ताब्यात घेतले असून त्याची सविस्तर चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रभाकर बुधवंत यांनी दिली.             

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 4:15 am

Web Title: girl jumped from running auto rickshaw in thane
Next Stories
1 मेट्रो कोरशेडच्या अभ्यासासाठी समिती
2 सईशी आज मनमोकळ्या गप्पा!
3 …तर मुंबईचा विकास आराखडा केराच्या टोपलीत टाकू – उद्धव ठाकरे
Just Now!
X