News Flash

सीएसटी स्थानकातून तरुणीचे अपहरण

छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकातून एका २२ वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. साखरपुडा मोडल्याने संतप्त झालेल्या तरुणाने तिचे अपहरण केल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी

| January 11, 2013 05:07 am

छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकातून एका २२ वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. साखरपुडा मोडल्याने संतप्त झालेल्या तरुणाने तिचे अपहरण केल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी दिल्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
क्रॉफर्ड मार्केट येथे राहणारी रमीसा बानू (२१) ही तरुणी भिंवडीच्या जी. एम. मोमिन्स महाविद्यालयात एसवाय बीएससीच्या तिसऱ्या वर्गात शिकते. बुधवारी ती नेहमीप्रमाणे महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली असता रेल्वे स्थानकातून सामिक शेख (२७) या तरुणाने तिचे अपहरण केले. अपहरणाची माहिती मिळताच रमीसाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
 रमीसाचा जून २०११ मध्ये पुण्याच्या सामिक शेख याच्याशी साखरपुडा झाला होता. पण काही महिन्यातच रमीसाच्या वडिलांनी सामिक याची खरी माहिती मिळाल्याने हा साखरपुडा मोडला होता. सामिक हा गुन्हेगारी पाश्र्वभूमीचा असून त्याने शिक्षण आणि कामाची माहिती लपविली होती. ती समोर आल्याने हा साखरपुडा मोडल्याचे रमीसाच्या वडिलांनी सांगितले. मात्र यानंतर सामिक तिला ब्लॅकमेल करत होता. मी अश्लील फोटो फेसबुकवर टाकेन, तुझ्या अश्लील चित्रफितीचा एमएमएस इंटरनेटवर टाकेन अशी धमकी तो तिला देत होता. मी सकाळी ७ वाजता तिच्याशी बोललो तेव्हा ती मदतीसाठी याचना करीत होती. त्यानंतर तिचा फोन बंद झाला, अशी माहिती रमिसाच्या वडिलांनी दिली. सीएसटी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल १२ तास घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2013 5:07 am

Web Title: girl kidnap case near to cst station
Next Stories
1 रेल्वे भाडेवाढीचा गोंधळ सुरूच!
2 एस.टी. कामगारांच्या मागण्यांसाठी मनसेच्या कामगार सेनेचा मोर्चा
3 २५ लाखांची खंडणी मागणारा राष्ट्रवादीचा नगरसेवक फरार
Just Now!
X