News Flash

प्रियकरासोबत बेडरुममध्ये असताना अचानक घरी आली आई, त्यानंतर तरुणीने केलं असं काही…

कुर्ल्यामध्ये ही घटना घडली आहे

प्रातिनिधिक

प्रियकरासोबत बेडरुममध्ये असताना अचानक आई घरी आल्याने एका तरुणीने खिडकीतून उडी मारल्याची घटना समोर आली आहे. कुर्ल्यामध्ये ही घटना घडली आहे. अल्पवयीन तरुणी प्रियकरासोबत बेडरुममध्ये होती. आई अचानक घरी आल्याने आपल्या पहिल्या माळ्यावरील फ्लॅटच्या खिडकीतून तिने उडी मारली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तरुणीच्या पायाला जखम झाली असून पायाचे हाड तुटलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी बैल बाजार परिसरात ही घटना घडली. “१७ वर्षीय मुलगी आपल्या प्रियकरासोबत बेडरुममध्ये होती. आपली आई घरी आली आल्याचं लक्षात येताच तिने प्रियकराला पळ काढण्यास सांगितलं. नंतर तिनेही खिडकीतून उडी मारली. इतक्या उंचीवरुन उडी मारल्याने तिच्या पायाचं हाड तुटलं आहे,” असं पोलिसांनी सांगितलं आहे.

तरुणीने नंतर आपल्या कुटुंबीयांकडे कबुली देत प्रियकरासोबत बेडरुममध्ये असल्याने घाबरलो होतो असं सांगितलं आहे. तरुणीच्या प्रियकराची ओळख पटली असून सुनील झेंडे असं त्याचं नाव आहे. “मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर आम्ही तरुणाला अटक केली असून त्याच्यावर बलात्कार, घरात घुसखोरी आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे,” असं पोलिसांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 9:47 am

Web Title: girl with boyfriend jumps from window after mother walks in sgy 87
Next Stories
1 मनसे वर्धापन दिन : राज ठाकरेंनी गाणं ट्विट करून मनसैनिकांमध्ये भरली ऊर्जा
2 सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण
3 Video : तब्बल हजार वर्ष जुन्या माहिमच्या किल्ल्याची दुर्दशा
Just Now!
X