News Flash

मुली असुरक्षित

डछाडीमुळे मला आणि माझ्या मैत्रिणीना घराबाहेर एकटय़ाला जाताना खूप भीती वाटते.

संग्रहीत छायाचित्र.

क्राय संस्थेच्या अभ्यास अहवालाचा निष्कर्ष

मुंबईतील मुख्य शहर परिसरामध्ये गणल्या जाणाऱ्या वांद्रे भागातील किशोरवयीन मुली असुरक्षित वातावरणामध्ये दडपणाखाली राहत असल्याचे ‘चाईल्ड राईट्स अ‍ॅण्ड यू’ (क्राय) या सामाजिक संस्थेच्या अभ्यास अहवालातून निदर्शनास आले आहे. वांद्रे रिक्लेमेशन व स्टेशन परिसरातील झोपडपट्टय़ामध्ये संस्थेच्या वतीने राबवण्यात आलेल्या ‘मॅपिंग’ प्रकल्पाअंतर्गत मुलींना धोकादायक आणि असुरक्षित वाटणाऱ्या जागांचा शोध घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईसारख्या शहरातही मुलींना असुरक्षित वाटत असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.

वांद्रय़ाच्या राहुलनगरमधील झोपडपट्टीमध्ये राहणारी मुस्कान (नाव बदलले आहे) व तिच्या मैत्रिणी एकत्रच शाळेत जातात. ‘घरातून बाहेर पडल्यानंतर शाळेपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर अनेक रिक्षावाले टोळक्याने उभे असतात. त्यांच्या समोरून जाताना फारच अवघडल्यासारखे वाटते. त्यामुळे आम्ही एकत्रच शाळेत जातो. कधीतरी एक दोन जणी शाळेत येत नसतील तर आम्हीपण शाळेत जाणे टाळतो. घरातून पण आम्हाला एकटे बाहेर सोडले जात नाही,’ असे मुस्कान सांगते, तेव्हा वांद्रेच्या झोपडपट्टीतील भीषण अवस्थेची कल्पना येते.

रस्त्यावर ठिकठिकाणी पुरुष व तरुण मुलांची टोळकी बसलेली असतात. छेडछाडीमुळे मला आणि माझ्या मैत्रिणीना घराबाहेर एकटय़ाला जाताना खूप भीती वाटते. त्यांच्या वाईट नजरा पाहून फारच कसे तरी वाटते. रात्रीच्या वेळेस रस्त्यावर, गल्ल्यांमध्ये दिवेच नसल्याने फारच भयानक परिस्थिती असते. सार्वजनिक शौचालयामध्येही दिवे नसल्याने शक्यतो आम्ही रात्रीच्या वेळेस जाणे टाळतो,’ असे इंदिराजी नगरातील १७ वर्षांची मुमताज (नाव बदलले आहे)सांगते.

क्राय व हॅबिटॅट अ‍ॅण्ड लाईवलीहूड वेल्फेअर असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरवयातील मुलींना आजूबाजूच्या परिसरामध्ये जाणवणाऱ्या समस्या असा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या प्रकल्पाचा भाग म्हणून या भागातील मुलींना वाटणारी असुरक्षित ठिकाणे जाणून घेण्यासाठी संस्थेने हाती घेतलेल्या अभ्यासांतर्गत ६ ते १८ वयोगटातील सुमारे ६० मुलामुलींशी चर्चा केली आहे. प्रत्यक्ष वस्तीमध्ये फिरून त्यांना असुरक्षित वाटणाऱ्या ठिकाणांची पाहणीही करण्यात आली आहे. जवळपास तीन महिने चालणाऱ्या या अभ्यासामध्ये शोधण्यात आलेल्या असुरक्षित ठिकाणांचा नकाशाच तयार करण्यात आला असून वस्तीतल्या मुलामुलींना या ठिकाणांबाबत सावधानदेखील करण्यात आले आहे.

एकदा आम्ही मुलींसोबत वांद्रे पश्चिम भागातून स्कायवॉकने पूर्वेकडे चाललो होतो. पुलावरील बऱ्याच ठिकाणचे बल्ब गेलेले असल्याने अंधार होता. आम्ही ही पाहणी करत असताना तिथल्या सुरक्षारक्षकाने पाहिले होते. त्यानंतर जवळपास आठवडाभराने आम्ही त्याचवेळेस स्कायवॉकवर गेल्यावर आश्चर्याचा धक्का बसला. सर्व बल्ब सुरू झाले होते आणि पुलावर लख्ख प्रकाश होता. आमच्या एका पावलाने छोटासा का होईना, बदल झालेला पाहून खूप आनंद झाला.

-आशा जगदाळे, समन्वयक, हलावा संस्था

वस्तीमध्ये शौचालये, वीज, दारूचे वाढते प्रमाण अनेक वर्षांपासूनच्या समस्या आहेत. परंतु या मॅपिंग प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक प्रशासनाने शौचालय आणि वीज आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

-कलामुद्दीन, प्रकल्प अधिकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 5:17 am

Web Title: girls are unsafe says child rights and you social organization report
Next Stories
1 पंचतारांकित रुग्णालये गरीब रुग्णांच्या दारी
2  ‘मॅनहोल’चे झाकण ४८ तासांत दुरुस्त
3 मोबाइल तिकीट अ‍ॅपचा उत्साह जास्त, प्रतिसाद कमी
Just Now!
X