News Flash

करोना योद्ध्यांच्या वारशांना सरकारी नोकरी द्या – विरोधी पक्षनेत्यांची मागणी

करोना काळात सेवा देताना मृत्यू झालेल्या कोविड योध्दांना शहिदांचा दर्जा द्यावा, अशी देखील केली मागणी

करोना योद्ध्यांच्या वारशांना सरकारी नोकरी द्या – विरोधी पक्षनेत्यांची मागणी
प्रतिकात्मक छायाचित्र

करोना काळात सेवा देताना मृत्युमुखी पडलेले डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार या कोविड योध्दांना शहिदांचा दर्जा द्यावा. तसेच, त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करुन त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज (सोमवार) सभागृहात केली. विधान परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावावर सहवेदना मांडताना दरेकर यांनी ही मागणी केली.

“आपली काहीही चूक नसताना, करोनाग्रस्तांना सेवा देताना, मदत करताना ज्यांचे निधन झाले. असे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस बांधव आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार यांच्या निधनामुळे त्यांचे कुटुंबीय वाऱ्यावर आले आहे. त्यांना शासनाने आर्थिक मदत करणे गरजेचे आहे,” असे दरेकर यांनी म्हटले. तसेच, या कोविड योध्दांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबातील कमविता व्यक्ती गमाविल्यामुळे त्या कुटुंबातील एका सदस्याला संबंधित मृत व्यक्तीच्या ठिकाणी शासकीय नोकरीत सामावून घेण्याची विनंतीही यावेळी दरेकर यांनी केली.

याचबरोबर पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचे नुकतेच करोनाने निधन झाले असल्याने, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केल्याप्रमाणे रायकर यांच्या कुटुंबियांना ५० लाखांचा विमा त्वरित देण्यात यावा. अशी मागणीही दरेकर यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2020 4:32 pm

Web Title: give government jobs to corona warriors heirs opposition leaders demand msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “मुंबईचा अपमान करणाऱ्या कंगनाला केंद्राने वाय दर्जाची सुरक्षा देणं धक्कादायक”
2 सुशांत मृत्यू प्रकरण : अफवा पसवणाऱ्या युट्यूबरला अटक
3 “मुंबईकरांची दिशाभूल करणारे महापौर, महापालिका आयुक्त आता माफी मागणार का?”
Just Now!
X