News Flash

आयपीएलमधून मिळणारा पैसा दुष्काळग्रस्तांना द्या

सध्या निम्मा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना आयपीएलचा घाट घातला जाता आहे. आयपीएल स्पर्धा खेळवायचीच असेल तर त्यातून मिळणारा पैसा दुष्काळग्रस्तांसाठी द्यावा, अशी मागणी शिवसेना प्रक्षप्रमुख

| April 3, 2013 04:26 am

सध्या निम्मा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना आयपीएलचा घाट घातला जाता आहे. आयपीएल स्पर्धा खेळवायचीच असेल तर त्यातून मिळणारा पैसा दुष्काळग्रस्तांसाठी द्यावा, अशी मागणी शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना आमदारांच्या बैठकीत बोलताना केली.
राज्यात निर्माण झालेली दुष्काळी स्थिती, पुढील वर्षी होऊ घातलेल्या निवडणुका आणि अन्य विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सायंकाळी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावली होती. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात अनेक भागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे. असे असताना आयपीएलसाठी हिरव्यागार मैदानांवर पाण्याची फवारणी करून त्याचा मोठय़ा प्रमाणावर अपव्यय होणार आहे. आयपीएलसाठी नेमके किती पाणी वापरणार, ते कुठून आणणार याची माहिती आयोजकांनी द्यावी, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 4:26 am

Web Title: give the money wich came from ipldemand from uddhav thackeray
Next Stories
1 राज्याला यंदाही आठच आयएएस अधिकारी मिळणार
2 प्राध्यापकांना १५०० कोटींची थकबाकी देणार
3 महिला बचत गटांच्या तोंडचा घास पळवणार?
Just Now!
X