मुंबई : देशात विरोधी पक्ष खिळखिळा असून संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए )मजबूत करण्याची गरज आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवावे, अशी भूमिका शिवसेनेचे प्रवक्ते  संजय राऊत यांनी मांडली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे यूपीएचे नेतृत्व सोपविल्यास शिवसेनेसह रालोआतून (एनडीए)  बाहेर पडलेल्या पक्षांसह देशभरातील भाजपविरोधातील पक्षही यूपीएमध्ये सहभागी होण्याचा विचार करतील, असे प्रतिपादन राऊत यांनी केले.

निरुपम यांचे प्रत्युत्तर

काँग्रेस पक्षाला दुगणे देत शरद पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवावे ही शिवसेनेची मागणी महाविकास आघाडी सरकारच्या मुळावर येऊ शकते. कारण शिवसेनेने सातत्याने काँग्रेसवर टीकाटिप्पणी के ल्यास काँग्रेस नेतृत्वाकडून पाठिंब्याबाबत फे रविचार होऊ शकतो.संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेतृत्वाबाबत शिवसेनेला चिंता असली तरी शिवसेना या आघाडीत आहेच कु ठे, असा सवाल काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी के ला आहे.