हिंदुस्थानी संगीत लिहून ठेवण्याची पद्धत एकोणिसाव्या शतकात ज्यांनी बनवली त्यांचं नाव पंडित विष्णू भातखंडे. भारतीय राग ज्या थाटात बसवतात ती शैली पंडित भातखंडेंनी विकसित केली आणि हिंदुस्थानी संगीत शिकणाऱ्या संगीतोपासकांसाठी आजही भातखंडेंचे ग्रंथ हा मोलाचा ठेवा आहे. भारतीय संगीतातल्या या मानबिंदूचा जन्म मुंबईत मलबार हिलवर बाणगंगेजवळ झाला.

दुसरं कुठलंही राष्ट्र असतं तर ज्या ठिकाणी जगभरातल्या संगीतप्रेमींना प्रेरणा देणारं म्युझियम दिसलं असतं, त्या ठिकाणी आज प्रत्यक्षात मात्र आहेत पंडित भातखंडेंच्या उध्वस्त घराचे दयनीय अवशेष… सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…