News Flash

मराठवाडय़ाच्या दुष्काळमुक्तीसाठी गोदावरी खोऱ्यातील पाणी उचलणार

केंद्र सरकारच्या साह्य़ाने देशातील पहिलाच आंतरराज्य नदीजोड प्रकल्प राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र आणि गुजरातने घेतला होता.

(संग्रहित छायाचित्र)

सतत दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाडय़ाला लवकरच मुबलक पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. दमणगंगा, पिंजाळ, नार, पार, तापी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून तब्बल ७३ टीएमसी पाणी उपसा सिंचनाच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात आणण्याचा आणि त्यातील २१ टीएमसी पाणी मुंबईला तर उर्वरित मराठवाडय़ातील दुष्काळी भागाला देण्याचा महत्वकांक्षी निर्णय मंगळवारी राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.  सुमारे १० हजार ८०० कोटी रूपये खर्चाचा हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या साह्य़ाने देशातील पहिलाच आंतरराज्य नदीजोड प्रकल्प राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र आणि गुजरातने घेतला होता. त्यानुसार दमणगंगा, पिंजाळ, नार,पार आणि तापी या पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातील वाया जाणारे पाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात आणण्यात येणार होते. या प्रकल्पातून महाराष्ट्राला ७३ टीएमसी तर गुजरातला ४७ टीएमसी पाणी मिळणार होते. नाशिक जिल्ह्य़ातील पेठ तालुक्यातील झरी धरणातून १५ टीएमसी पाणी गुजरातला देण्यात येणार होते.  मात्र  त्या बदल्यात गुजरातच्या मालकीच्या उकाई धरणातून राज्याला देय असलेले १५ टीएमसी पाणी देण्याबाबत गुजरातने नकारात्मक सूर लावल्याने गेल्या अडीच वर्षांपासून हा प्रकल्प केवळ चर्चेच्या गुऱ्हाळात अडकून पडला होता. त्यामुळे आता गुजरातची मनधरणी न करता या संयुक्त प्रकल्पातून बाहेर पडण्याचा आणि हा प्रकल्प स्वत:च राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार नार-पार- गिरणा खोऱ्यातील वाया जाणारे व छोटय़ा छोटय़ा ३९ धरणांच्या माध्यमातून अडविण्यात येणारे हे पाणी नदी दोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यातील गंगापूर, करंजवन आणि कडवा धरणात आणण्यात येणार आहे. तेथून हे पाणी गोदावरी खोऱ्यातून मराठवाडय़ातील दुष्काळी भागात नेण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 1:37 am

Web Title: godavari will raise water in the valley for drought relief of marathwada abn 97
Next Stories
1 नाटय़गृहातील मोबाइलबंदीसाठी कलाकारांचा पुढाकार
2 मुंबई-पुणे हायपरलूपला पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता
3 मुख्यमंत्र्यांना राज्यातील महिलांकडून २१ लाख राख्या
Just Now!
X