News Flash

GOOD NEWS : उद्यापासून गोकुळचे दूध होणार स्वस्त

ग्राहकांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. उद्यापासून गोकुळचे गाईचे दूध दोन रुपयांनी स्वस्त होणार आहे. कोल्हापुरात गोकुळच्या गाईच्या दूधाची खरेदी २३ रुपयाने होणार आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

ग्राहकांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. उद्यापासून गोकुळचे गाईचे दूध दोन रुपयांनी स्वस्त होणार आहे. कोल्हापुरात गोकुळच्या गाईच्या दूधाची खरेदी २३ रुपयाने होणार आहे. २१ जूनपासून नवीन दरांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार मुंबईत गोकुळचे गाईचे प्रतिलिटर दूधाचे दर ४४ रुपये आहेत. आता उद्यापासून हे दूध ४२ रुपयांना मिळणार आहे. गोकूळ दूध संघाने दरात दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

गोकुळकडून दररोज साडेचार लाख लिटर दूध संकलित केले जाते. पण जेवढे दूध संकलित केले जाते त्याप्रमाणात विक्री होत नसल्याने दर कपातीचा निर्णय घेतला आहे. गोकुळची मुख्य बाजापेठ मुंबई आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2018 10:25 am

Web Title: gokul milk price cut kolhapur
टॅग : Gokul,Milk
Next Stories
1 माथेरानमध्ये सेल्फी घेताना विवाहिता दरीत कोसळली
2 भारताची अर्थव्यवस्था ‘बँकबुडी’च्या टोकावर: शिवसेना
3 VIDEO: मुंबई- पुणे मार्गावरील प्रस्तावित ‘हायपरलूप’ची डिझाईन बघितली का?
Just Now!
X