मुंबई येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुमारे ३८ लाख ५२ हजार ३६० रूपयांचे सव्वा किलो वजनाची १२ सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली. अबकारी विभागाने गुरूवारी ही कारवाई केली. एका बॅगमध्ये लपवून सोन्याची तस्करी केली जात होती. सोने कुठून आणले, कोठे नेले जात होते याची चौकशी सुरू आहे.
विमानतळावर सोने तस्करांना पकडण्याची ही पहिलीच वेळ नाही. गत महिन्यात एका ८३ वर्षीय वृद्धास १९ लाखांच्या सोन्याची तस्करी करताना पकडण्यात आले होते. त्याने टिश्यू पेपरमध्ये सोन्याची बिस्किटे लपवली होती.
तर ऑगस्ट महिन्यात अंर्तवस्त्रांमध्ये सुमारे ६४ लाखांचे सोने लपवून तस्करी केल्याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली होती. जुलै महिन्यात मुंबई अंमली पदार्थविरोधी पथकाने एका केनियन नागरिकाकडून २.२५ कोटींचे सोने जप्त करण्यात आले होते.