27 February 2021

News Flash

मुंबई विद्यापीठाला सुवर्ण पदक

विद्यापीठाच्या संघाने साकारलेल्या‘मल्टी एग्रो मॅकेनिझम’ या प्रकल्पाला पारितोषिक मिळाले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या संघाने साकारलेला‘मल्टी एग्रो मॅकेनिझम’ प्रकल्प आणि तो साकारणारे विद्यार्थी विक्रांत पाल, कुणार पवार आणि पंकज पाटील.

भारतीय विद्यापीठ संघाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय विद्यार्थी संशोधन महोत्सवात मुंबई विद्यापीठाने सुवर्ण पदक पटकावले आहे. विद्यापीठाच्या संघाने साकारलेल्या‘मल्टी एग्रो मॅकेनिझम’ या प्रकल्पाला पारितोषिक मिळाले आहे.

राजीव गांधी प्राद्यौगिक विद्यापीठ भोपाळ येथे १५ आणि १६ डिसेंबरला आभासी प्रणालीच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विभागीय फेरी आणि राष्ट्रीय फेरी अशा दोन स्तरावर ही स्पर्धा झाली. पाच विभागांमधून निवडण्यात आलेल्या संघांमध्ये राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा झाली. राष्ट्रीय पातळीवरील या महोत्सवात देशातील एकूण ४५ विद्यापीठांचे संशोधन प्रकल्प पात्र ठरले होते. पश्चिम क्षेत्र विभागातून विजेते ठरून राष्ट्रीय फेरीत सहभागी झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या संघाने कृषी विषयातील प्रकल्प सादर केला होता. ‘मल्टी एग्रो मॅकेनिझम’ या प्रकल्पाला राष्ट्रीय फेरीतही सुवर्ण पदक मिळाले आहे.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे विक्रांत पाल, कुणार पवार आणि पंकज पाटील या तीन विद्यार्थ्यांनी मिळून ‘मल्टी एग्रो मॅकेनिझम’ नावाचे यंत्र तयार केले. पेरणी, फवारणी, कापणी, मातीची निगा, दोन रोपांतील गवत काढणे, गवताची मुळे उखळून काढणे अशी सहा विविध कामे या एकाच यंत्राद्वारे होऊ शकतात. विशेष म्हणजे हे यंत्र सौर ऊर्जेवर चालणारे असून कमी दरात ते उपलब्ध करून देता येऊ शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2020 12:39 am

Web Title: gold medal to mumbai university abn 97
Next Stories
1 अल्पसंख्याक मंत्र्यांच्या आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती
2 ‘आयआयटी’च्या नोकरी मेळाव्यातील संधींत घट
3 मुंबईत मंगळवारी १५ टक्के पाणी कपात
Just Now!
X