News Flash

भुलेश्वर येथे सुवर्णकाराची आत्महत्या

अर्थसंकल्पात नव्या अबकारी कराच्या विरोधात देशभरातील सोन्याच्या व्यापाऱ्यांनी संप पुकारला आहे.

एकीकडे सोन्याच्या व्यापाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरु असतानाच बेकारी आणि आजारपणाला कंटाळुन एका सुवर्णकाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भुलेश्वर येथे मंगळवारी उघडकीस आली. सुशांत समांतो (३५) असे या सुवर्णकाराचे नाव असून त्याने सोमवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.

अर्थसंकल्पात नव्या अबकारी कराच्या विरोधात देशभरातील सोन्याच्या व्यापाऱ्यांनी संप पुकारला आहे.

देशासह मुंबईतीलही अनेक सोन्याची दुकाने महिन्याभरापासून बंद आहेत. त्यामुळे अनेक सुवर्णकार घायकुतीला आले आहेत. भुलेश्वर येथे राहणारा सुशांत समांतो सुवर्णकार होता.

त्यालाही गेल्या महिन्याभरापासून काम नव्हते. त्यातच, त्याची तब्येतही बिघडली होती, त्यामुळे त्याला खासगी रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते.

नैराश्यात असलेल्या सुशांतने सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास तो राहात असलेल्या भुलेश्वरमधील पंचायतवाडीतील घरात गळ्यातील मफलरने गळफास घेतला. त्याच्या सोबत राहणाऱ्या मित्राने त्याला तातडीने गोकुळदास तेजपाल रुग्णालयात नेले. मात्र, दाखल करताक्षणीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

राज्यातील दुष्काळी भागातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. ही गोष्ट अस्वस्थ करते. त्यामुळे पारितोषिकाची रक्कम ‘नाम फाऊंडेशन’ला देण्याचा निर्णय घेतला आहे. माझे वडील अनेक वर्षे शेती करत होते. मात्र कर्जाची रक्कम वेळेवर भरू न शकल्याने त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. अशी परिस्थती इतर शेतकऱ्यावर ओढवू नये, असे मला वाटते. – प्रबोध माणगांवकर,

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 12:06 am

Web Title: goldsmith suicide at the bhuleshwar
Next Stories
1 मुलुंड बॉम्बस्फोटातील दोषींना आज शिक्षा
2 ‘रुग्णाची बेकायदा अडवणूक हा गुन्हाच’
3 PANAMA PAPERS : माझा कोणत्याही परदेशी कंपनीशी संबंध नाही- अमिताभ बच्चन
Just Now!
X