राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री विविध घटकातील लोकांच्या समस्या सोडवण्यावर भर देत असल्याचे दिसत आहे. आजच निवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटीला आले होत. यावेळी अनेक दिवसांपासूनल प्रलंबीत असलेल्या मागण्यांचा पाढा त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर वाचला. यावर अनपेक्षितपणे मुख्यमंत्र्यांनी ६० वर्षे हे सेवानिवृत्तीच वय करण्याबाबत पुढच्याच महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये निर्णय घेणार असल्याचे त्यांना आश्वासन दिले. एवढेच नाहीतर या वर्षाच्या अखेरीसपर्यंत पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबतही निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल आहे.

आजच्या या बैठकीत दोन महत्वाचे निर्णय घेतल्या जातील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल होत. त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांपाठोपाठ आता निवृत्ती वेतन धारकांनाही आता महागाई भत्त्यात वाढ करण्याचा अध्यादेश आज लागू झालेला आहे. जानेवारी २०१९ पासून थकबाकीसह भत्तावाढीची रक्कम मिळणार आहे. साधारण तीन टक्क्यांनी ही वाढ लागू होणार आहे. सुमारे सात लाख निवृत्तीधारकांना याचा लाभ मिळणार आहे.