25 January 2021

News Flash

राज्यात सर्वत्र चांगला पाऊस

१९ जिल्ह्य़ांमध्ये सरासरीपेक्षा अधिक

(संग्रहित छायाचित्र)

राज्यात आतापर्यंत सर्वत्र चांगला पाऊस झाला असून, जून ते ऑगस्टअखेपर्यंत राज्यात सरासरीच्या १०५ टक्के  पाऊस झाला. समाधानकारक पावसाने यंदा पीक परिस्थिती चांगली असेल.

चांगला पाऊस झाल्याने राज्यातील जलाशयांमध्येही साठा चांगला झाला. बहुतांशी धरणे भरल्याने किंवा पातळी वाढल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही, अशी चिन्हे आहेत. कायम दुष्काळी अशी ओळख झालेल्या मराठवाडय़ातही यंदा चांगला पाऊस झाला. हे राज्यासाठी समाधानकारकच आहे. सहा विभागांचा आढावा घेतल्यास पुणे महसूल विभागातच तुलनेत कमी पाऊस झाला. अन्यत्र जून ते ऑगस्टअखेपर्यंत सर्वच जिल्ह्य़ांमध्ये सरासरीच्या चांगला पाऊस झाला.

विभागनिहाय पाऊस

कोकण – १०५ टक्के

अमरावती – १०१.४ टक्के

मराठवाडा – १०८.९ टक्के

पुणे – ८६.५ टक्के

नाशिक – १०८.७ टक्के

नागपूर – ९५.१ टक्के

जिल्हानिहाय पाऊस (सरासरीच्या एकू ण पाऊस)

* कोकण – ठाणे – १०० टक्के , रायगड – ८१ टक्के , रत्नागिरी – १०८ टक्के , सिंधुदुर्ग – १२८.२ टक्के , पालघर – १११.३ टक्के

* मराठवाडा – औरंगाबाद – १५९.६ टक्के , जालना – १५६.६ टक्के , बीड – १२४ टक्के , लातूर – ८५.३ टक्के , उस्मानाबाद – ८० टक्के , नांदेड – ८५.३ टक्के , परभणी – ९४.६ टक्के , हिंगोली – ११० टक्के

* नाशिक – नाशिक – ८८.५ टक्के , धुळे – १३५.८ टक्के , नंदुरबार – ७०.७ टक्के , जळगाव – १३३.३ टक्के , नगर – १७५ टक्के

* पुणे – पुणे – ८७ टक्के , सोलापूर – १२७ टक्के , सातारा – ९७.३ टक्के , सांगली – १२५.२ टक्के , कोल्हापूर – ७७.५ टक्के .

* नागपूर – नागपूर – ९५.१ टक्के , वर्धा – ८२.६ टक्के , नागपूर -१०७.२ टक्के , भंडारा – ११३.२ टक्के , गोंदिया – ११९ टक्के , चांद्रपूर – ८१.२ टक्के , गडचिरोली – ७३.९ टक्के

* अमरावती – बुलढाणा – ११२ टक्के , अकोला – ८७.६ टक्के , वाशिम – ११५ टक्के , अमरावती -९६ टक्के , यवतमाळ – ९१.६ टक्के

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 12:18 am

Web Title: good rain everywhere in the state abn 97
Next Stories
1 ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात पदवी परीक्षा
2 सर्वकार्येषु सर्वदा : शिक्षणाची गंगा वाहती राहावी म्हणून..
3 उद्यापासून ई-पासमुक्त प्रवास
Just Now!
X