गुगलवर दिसणारे आकर्षक डूडल्स विकसित करणे ही एक व्यवसायाची संधी होऊ शकते, असे चक्क गुगलचा प्रमुख डूडलकार रायन जर्मिक यांनी स्पष्ट केले. ज्यांच्याकडे कल्पकता आहे आणि सहा अक्षरांत खेळण्याची कम्माल आहे अशांना ही व्यावसायिक संधी खुणावत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आयआयटी मुंबईतील टेकफेस्टच्या शेवटच्या दिवशी जर्मिक यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. अभ्यास दौऱ्यासाठी भारतात आलेले असताना गणपतीची मूर्ती आवडली. त्याचवेळी भारतीय मुलीची विवाह करण्याचा ठरविला आणि त्याप्रमाणे केलेही. यानंतर गुगलमध्ये नोकरी मिळवून डूडलच्या निर्मितीत ते लागले. त्यांनी तयार केलेला रजनिकांतचा डूडल हा सर्वात लोकप्रिय डूडल ठरला. डूडल करण्यासाठी माणूसाची कल्पकता लागतेच. एखादे यंत्र गुगलच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये येणाऱ्या सहा अक्षरांमध्ये डूडल तयार करू शकत नाही यामुळे डूडल बनविणे ही एक व्यावसायिक संधी होऊ शकते असे त्यांनी नमूद केले.