30 October 2020

News Flash

‘गुगलमॅप’वर विकिपीडियाचे ‘जाणते’ पाऊल!

प्रवासादरम्यान आपण ज्या ठिकाणी जात आहोत त्या ठिकाणाचे महत्त्व जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते.

‘विकि-नीअरबाय’ अ‍ॅपच्या माध्यमातून महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती एका क्लिकवर

आपण प्रवासात असताना गुगलचे किंवा अन्य कोणतेही नीअरबायचे अ‍ॅप वापरून परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती मिळवतो. यात एखादे ऐतिहासिक ठिकाण असेल किंवा ते शहर महत्त्वाच्या व्यक्तीचे जन्मस्थान असेल तर तो तपशील गुगल सर्चच्या माध्यमातून मिळवावा लागतो. पण आता थेट नकाशावरच एका  क्लिकवर हा सर्व तपशील मराठी आणि इंग्रजीत मिळू शकणार आहे. यासाठी देशातील विकिपीडिया समुदायाने विकि-नीअरबाय’ हे अ‍ॅप विकसित केले आहे.

विकिपीडिया अधिक समृद्ध व्हावा यासाठीच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून दरवर्षी आयआयटी मुंबईत हॅकेथॉन भरविली जाते. यामध्ये या वर्षी सहभागी तज्ज्ञांना विकिपीडियाच्या तांत्रिक कामासाठी उपयुक्त आणि लोकांना उपयुक्त असे अ‍ॅप्स आणि टूल्स विकसित करण्याचे आव्हान होते. याच हॅकेथॉनमध्ये ‘विकि-नीअरबाय’ विकसित करण्यात आले.

प्रवासादरम्यान आपण ज्या ठिकाणी जात आहोत त्या ठिकाणाचे महत्त्व जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. यासाठी लोक गुगल सर्चच्या माध्यमातून त्या ठिकाणची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात. त्या वेळेस प्रथम शोध निकाल हा विकिपीडिया या संकेतस्थळाचाच येतो. त्यामुळे त्यातील माहिती लोकांना एका क्लिकवर उपलब्ध व्हावी या उद्देशाने गुगल नकाशावर जर एका सांकेतिक चिन्हाने महत्त्वाची ठिकाणे दाखविली आणि त्या चिन्हावर क्लिक केल्यावर त्यासंबंधीची थोडक्यात माहिती तिथेच झळकली तर, या कल्पनेतून ‘विकि-नीअरबाय’ अ‍ॅप विकसित झाल्याचे मराठी विकिपीडियाचे प्र-चालक डॉ. राहुल देशमुख यांनी सांगितले.

या हॅकेथॉनमध्ये देशातील नामांकित संस्थांमधील तज्ज्ञांबरोबरच विद्यार्थीही सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचा सहभाग ३० टक्के होता, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.

विकि अ‍ॅनिमेटर –

  • या हॅकेथॉनमध्ये विकि अ‍ॅनिमेटर हे टूलही विकसित करण्यात आले आहे. याच्या माध्यमातून आपण एखाद्या माहितीवर क्लिक केले तर ती माहिती अ‍ॅनिमेशन स्वरूपात उपलब्ध होऊ शकणार आहे.
  • विकि डॅशबोर्ड – यामध्ये विविध विषयांची आकडेवारी सांख्यिकी स्वरूपात मांडली जाईल. इतर टूल हॅकेथॉनमध्ये विकि सजेस्ट, विकि राइट, विकि पोर्ट अशी विकिपीडिया अद्ययावत करणाऱ्यांसाठी आवश्यक टूल्स विकसित करण्यात आली आहेत.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2016 2:28 am

Web Title: google maps now supports multi stop routes on android
Next Stories
1 एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. शशिकला वंजारी यांची नियुक्ती 
2 ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये ‘अंतारंभ’वर व्यक्त व्हा..
3 बेलगाम झोपडय़ांवर कारवाईचे आदेश
Just Now!
X