07 March 2021

News Flash

मुंबईतील भावी खासदारांची कोटीकोटींची संपत्ती

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. संजय निरूपम, गोपाळ शेट्टी, गुरुदास कामत यांनी दाखल

| April 2, 2014 01:22 am

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. संजय निरूपम, गोपाळ शेट्टी, गुरुदास कामत यांनी दाखल केलेल्या संपत्तीच्या प्रतिज्ञापत्रावर नजर टाकल्यास हे सर्व कोटय़धीश असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे अशिक्षित असलेल्या राखी सावंतकडे १५ कोटींची मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले.

संजय निरुपम (काँग्रेस, उत्तर मुंबई)
* ५३ लाख ९३ हजार ७३० रुपयांची जंगम मालमत्ता
* ४७ लाख ८६ हजार ८७८ रुपयांची स्थावर मालमत्ता
* पत्नीच्या नावावर ५९ लाख ४ हजार २६४ रुपयांची जंगम. मुलगी-आईच्या नावावर ३४ लाख रुपये
* ४३ लाख २८ हजार ५२२ रुपयांची स्थावर संपत्ती, जमिनीचे मूल्य दोन कोटी
* सात लाख ८६ हजारांचे सोने

गोपाळ शेट्टी (भाजप, उत्तर मुंबई)
* ९३ लाख ८४ हजार रुपयांची जंगम मालमत्ता
* पत्नीच्या नावे २ कोटी ४६ लाख ५२ हजार रुपयांची मालमत्ता
* आईच्या नावावर ४ लाख १५ हजार रुपयांची जंगम मालमत्ता
* ११ लाखांचे सोने. बदलापुरात २५ लाख रुपये किमतीची दीड एकर जमीन
* कांदिवलीतील घराची किंमत ४० लाख रुपये
* स्थावर मालमत्ता ६५ लाख

गुरुदास कामत (काँग्रेस, वायव्य मुंबई)
* स्वतच्या नावावर सहा कोटींची जंगम मालमत्ता
* पत्नीच्या नावे पाच कोटी ८२ लाखांची मालमत्ता,  १० कोटीचे घर
* बँकेत साडेपाच कोटींच्या ठेवी
* २७ लाख रुपये किमतीचे सोने
* जमिनींची किंमत २० लाख रुपये
* वरळीतील घराची किंमत तीन कोटी रुपये
* दिल्लीतील घराची किंमत २६ कोटी रुपये

राखी सावंत (राष्ट्रीय आम पक्ष, वायव्य मुंबई)
बॉलिवूडची आयटम गर्ल राखी सावंत हिनेही उमेदवारीसाठी अर्ज भरला़  राखीने ती अशिक्षित असल्याचे म्हटले आह़े  मात्र त्याचवेळी तिच्याकडे १४.६९ कोटींची संपत्ती असल्याचेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आह़े  राखीकडे ३.५७ कोटींची जंगम आणि ११.१२ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आह़े  ९६ हजार ४२७ रुपये नगद आणि ३९.१३ लाखांची मुदत ठेव, तसेच ६१.२६ लाखांचे रोखे आणि समभाग, तर २.१२ कोटी रुपयांचा विमा आणि पोस्ट बचत, असे राखीच्या मालमत्तेचे एकंदर स्वरूप आह़े तिच्याकडे २१ लाखांची फोर्ड एंडेव्हर कार आणि ७.५५ लाखांचे दागिनेही आहेत़  विशेष म्हणजे राखीवर २.५२ कोटींचे कर्जही आह़े तिच्यावर फसवणुकीचा गुन्हाही दाखल आह़े

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2014 1:22 am

Web Title: gopal shetty gurudas kamat sanjay nirupam rakhi sawant files nomimation in mumbai
Next Stories
1 आजही घंटी बंदच?
2 मनसेला दुर्लक्षून चालणार नाही * शरद पवार यांचे मत
3 आठवडय़ाची मुलाखत : आम्हीच का..?
Just Now!
X