News Flash

गोरेगावमधील कामा इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये भीषण आग

कामा इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास आग लागली.

गोरेगावमधील कामा इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून अग्निशमन दलाचे १२ बंब घटनास्थळी पोहोचले आहेत. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

कामा इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास आग लागली. आग झपाट्याने पसरत गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अग्निशमन दलाच्या पथकानेही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे १२ बंब घटनास्थळी असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कामा इंडस्ट्रीयल इस्टेटमधील ज्या गोदामात आग लागली ते गोदाम धर्मा प्रॉडक्शनचे असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 7:38 am

Web Title: goregaon fire broke out at cama industrial estate fire tenders at spot
Next Stories
1 २०१४ चा विक्रम मोडीत!
2 मतदारसंघ ईशान्य मुंबई : मतदारांचा उत्साह आणि अफवांना ऊत
3 मतदारसंघ दक्षिण मुंबई : अमराठी मतदारांची गर्दी
Just Now!
X