05 March 2021

News Flash

अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी तिघांना अटक

गोरेगावमध्ये एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी मंगळवारी तीन आरोपींना अटक करण्यात आली.

| November 5, 2013 12:30 pm

गोरेगावमध्ये एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी मंगळवारी तीन आरोपींना अटक करण्यात आली. दिंडोशी पोलीसांनी ही माहिती दिली. वसीम वट्टा, सूर्या पिल्लई आणि शिवकुमार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या सर्वांना मुंबईच्या बाहेरून ताब्यात घेण्यात आले. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीसांची चार पथके तयार करण्यात आली असून, उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात येतो आहे.
शक्ती मिल कंपाऊंडमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेचे व्रण ताजे असताना गोरेगावात परिचित युवकांनी एका अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी घडली. धनत्रयोदशीच्या रात्री या तरुणीला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी दोन तरुणांनी बोलावून घेतले. त्यानंतर या दोघांसह आणखी दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. या तरुणीने रविवारी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
गोरेगाव पूर्व येथील ही तरुणी शुक्रवारी दोन मित्रांकडे गेली होती. तेथे त्यांचे आणखी दोन मित्र आले होते. ही तरुणी घरात शिरल्यानंतर त्यांनी तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या मुलीने विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो तोकडा पडला. अखेर रात्री साडेअकराच्या सुमारास तिची सुटका झाली. त्या रात्री तरुणीने आपल्या आईवडिलांना काहीच सांगितले नाही. मात्र, अखेर तिने भीत भीत आपल्या आईवडिलांना घडला प्रकार सांगितला. हा प्रकार कानावर पडताच हबकलेल्या पालकांनी तातडीने दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2013 12:30 pm

Web Title: goregaon gangrape three accused arrested
Next Stories
1 मोदीच पंतप्रधान व्हावेत- मिस एशिया पॅसिफिक सृष्टी राणा
2 भारतीय बाजारपेठेवर मोबाइल कंपन्यांची चढाई!
3 अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार
Just Now!
X