बाणगंगेच्या आजुबाजुला शंभरच्या आसपास मंदिरं आहेत. त्यातलं आवर्जून भेट द्यावं असं एक मंदिर आहे बालाजी मंदिर. हे अडिचशे वर्ष जुनं असलेलं व मराठा शैलीमधलं मूळ लाकडी नक्षीकाम अद्यापही शाबूत ठेवलेलं हे मंदिर आहे. महत्त्वाच्या व्यक्तिंचं स्वागत करण्यासाठी प्रवेशद्वारावर असलेला नगारखाना, विष्णूचं वाहन असलेली मनुष्यरुपातील गरुडाची मूर्ती, कोकण शैलीतील दीपमाळ या गोष्टी या ठिकाणी बघायला मिळतात.

एरवी काळ्या पाषाणामध्ये असणारा बालाजी या ठिकाणी पांढऱ्या संगमरवरात आहे, तसंच मिश्र शैलीचा प्रभाव हे या मंदिराचं वैशिष्ट्य असल्याचं सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…