मुंबईचा बंदराचा विकास प्रामुख्यानं झाला व्यापारी हेतुनं. मात्र ब्रिटिशकालीन मुंबईकरांनी या बंदराचा उपयोग केवळ व्यापारासाठी नाही तर नौकानयनाचा आनंद लुटण्यासाठी केला. आजही तुम्ही गेट वे ऑफ इंडियाला बघितलंत तर तुम्हाला शेकडो बोटी दिसतील, ज्या नौकानयनासाठी वापरल्या जातात, व्यापारासाठी नाही. मुंबईतला पहिला यॉट क्लब इथंच सुरू झाला. या यॉट क्लबचा कारभार मुंबई पोर्ट ट्रस्टनं भाड्यानं दिलेल्या दोन जागांमधून चालायचा. कालांतरानं या ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तुंचं जतन करावं असा मतप्रवाह पुढे आला व उभी राहिली हेरिटेज चळवळ. मुंबईचं हेरिटेज वैभव अबाधित राखण्यासाठी ज्या वास्तुंपासून चळवळीची सुरूवात झाली त्या वास्तुंचा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…