News Flash

Video: मुंबईचं राजभवन राहिलेल्या २५० वर्ष जुन्या इमारतीचा इतिहास

मलबार हिलच्या आधीचं राजभवन माहितीय का?

मलबार हिलमध्ये असणारं राजभवन सर्वांनाच माहिती आहे. पण त्याआधी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी राजभवन होतं, बॉम्बे कॅसलच्या आतमध्ये मुंबईचं पहिलं राजभवन होतं. तर फोर्टमध्ये बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या बाजूला असणाऱ्या राजा बहादूर मेन्शनमध्ये दुसरं राजभवन होतं. ही इमारत २५० वर्ष जुनी आहे. ब्रिटिशांनी ही इमारत विकत घेतली होती. सर्वात जास्त काळ गव्हर्नर राहिलेल्या जोनाथन डंकन यांचं निधन याच इमारतीत झालं होतं. पुढे जाऊन राजा बहादूर यांनी ही संपत्ती विकत घेतली आणि त्याचं नाव राजा बहादूर मेन्शन असं पडलं. याबद्दल सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

हा व्हिडीओ आणि ‘गोष्ट मुंबईची’ ही व्हिडीओ सीरिज तुम्हाला कशी वाटली हे युट्यूब व फेसबुकच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 9:17 am

Web Title: goshta mumbaichi history of building that was mumbai raj bhavan sgy 87
Next Stories
1 बोरिवलीत सर्वाधिक प्रतिबंधित क्षेत्रे
2 इमारतीतून बाहेर पडलेल्या रहिवाशावर गुन्हा
3 रुळांजवळील ९७८ अतिक्रमणांवर हातोडा
Just Now!
X