फोर्टमध्ये अकबरअलीज डिपार्टमेंटल स्टोअर असणाऱ्या वास्तूचा फार जुना आणि स्वातंत्र्यापूर्वीपासूनचा रंजक इतिहास आहे. मुंबईत इंग्रजांची राजवट असताना फोर्टमधील या भागात फक्त इंग्रजांसाठी डिपार्टमेंटल स्टोअर होतं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रज निघून गेले आणि हे डिपार्टमेंटल स्टोअर बंद झालं. नंतर या वास्तूमध्ये दोन इटालियन भावांची बेकरी होती.

औषधांचा व्यवसाय असणाऱ्या खोराकीवाला यांनी ही बेकरी त्यांच्याकडून विकत घेतली आणि तिथे पहिलं भारतीय डिपार्टमेंटल स्टोअर सुरु झालं. हा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…