गौडपादाचार्य हे आदी शंकराचार्यांच्या गुरूंचे गुरू, त्यांनी गोव्यामध्ये इ.स. ७४० मध्ये कवळे म्हणजे कैवल्य मठाची स्थापन केली. या मठाची एक शाखा असलेला मठ, मलबार हिलवरील वाळकेश्वर येथे आहे. या मठात मध्यभागी शांतादुर्गेचं मंदिर आहे. दुर्गा हे रौद्ररुप असतं, परंतु दुर्गेचं शांत रुप म्हणजे शांतादुर्गा. गोव्यामध्ये कवळे येथे असलेल्या मूळ मंदिराचं प्रतिरुप म्हणजे मुंबईतलं हे मंदिर.

मंदिराच्या चारही बाजुनं मठ आहे. या मठाचे तीन स्वामीजी ज्यांचं प्राणोत्क्रमण मुंबईत झालं, त्यांच्या समाध्या या मठात आहेत. कवळे मठाचा इतिहास सांगतायत, खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…