आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यात केला. यामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने घरकुल योजनेची घोषणा करण्यात आली. त्यानुसार, ८० टक्के दिव्यांग असणाऱ्या व्यक्तीला सरकार स्वतः घर बांधून देणार आहे.


मुनगंटीवार यांनी सांगितल्याप्रमाणे, दिव्यांग व्यक्तीच्या निवाऱ्याची सोय व्हावी यासाठी सरकारने घरकुल योजना आणली असून त्याअंतर्गत ८० टक्के अपंगत्व असलेल्या व्यक्तीला सरकार घर बांधून देणार आहे. या योजनेसाठी १०० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (पीएमएवाय) झालेल्या कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. पीएमएवाय योजनेंतर्गत राज्यात मंजूर झालेल्या ५ लाख ७८ हजार १०९ घरांपैकी ४ लाख २१ हजार ३२९ घरे बांधण्यात आली आहेत. तसेच आणखी ६ लाख ६१ हजार ७९९ घरे बांधण्याची योजना असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.