मुंबई शहर, उपनगर, पुणे, अमरावती, वर्धा व नंदुरबार या सहा जिल्ह्य़ांतील सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आधार नोंदणीला मुदतवाढ देण्याचे राज्याच्या वित्त विभागाने मान्य केल्याने या कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने ही माहिती दिली. उपरोक्त सहा जिल्ह्य़ांतील कर्मचाऱ्यांनी आधार क्रमांकाची नोंद केली नाही, तर त्यांना मे महिन्याचे वेतन मिळणार नाही, असे बजावण्यात आले होते. याच संदर्भात संघटनेच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी वित्त सचिवांशी चर्चा केली. त्यानंतर मुदतवाढ देण्याचे सचिवांनी मान्य केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन रखडणार नाही.