महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी नवे शासकीय मराठी महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यानी केली.

शिवाजी विद्यापीठांतर्गत उपकेंद्र किंवा शासकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून पुढील शैक्षणिक वर्षांपासून (२०२१-२२) हे महाविद्यालय सुरू करण्याचे नियोजन आहे.  कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात या शासकीय मराठी महाविद्यालयासाठी पाच एकर जमीन उपलब्ध झाल्यानंतर त्याचा बृहत आराखडा तयार करून या महाविद्यालयाला शासन स्तरावरील सर्व मान्यता देण्यात येईल, असे सामंत यांनी सांगितले.